चिंचवडगावात ‘वुई रन’ शर्यत उत्साहात

चिंचवडगावात ‘वुई रन’ शर्यत उत्साहात

Published on

पिंपरी, ता. ९ ः पीसीएमसी रनर्स ग्रुपतर्फे, चिंचवडगावात खास महिलांसाठी आयोजित ‘वुई रन’ शर्यत रविवारी उत्साहात झाली. त्यातील दहा किलोमीटर गटात शाबू गोसावी, धन्या कांबरथ यांनी विजेतेपद पटकाविले. तर पाच किलोमीटर गटात वैष्णवी सरडे, प्राजक्ता राडके यांनी बाजी मारली. शर्यतीचे यंदाचे सहावे वर्ष होते.
स्त्री ही समाजाची आधारशक्ती असते. ती तंदुरुस्त असेल; तर कुटुंबाचा पाया भक्कम राहतो. हाच तंदुरुस्तीचा विचार सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही शर्यत भरविण्यात आली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती मुग्धा वाव्हळ हिच्या हस्ते झेंडा दाखवून शर्यतीला सुरुवात झाली. दहा, पाच आणि तीन किलोमीटर अशा तीन गटांत ही शर्यत झाली होती. तीन वर्षांच्या गोंडस मुलीपासून ७२ वर्षांच्या आजीपर्यंत सर्व जणींचा उत्साह धावताना ओसंडत होता. एकूण सुमारे १ हजार २०० महिला धावपटूंनी शर्यतीत सहभाग घेतला. पीसीएमसी रनर्स ग्रुपच्या सुमारे १२० व्हॉलेंटियर्सनी या शर्यतीसाठी अथक परिश्रम केले. दहा किलोमीटरसाठी चिंचवडगाव, एल्प्रो स्कूल, कामिनी चौक, एसकेएफ, क्वीन्स टाऊन अशा शर्यतीचा मार्ग राहिला.
तीन आणि पाच किलोमीटर गटात सुमारे ५७५ तर दहा किलोमीटर गटात १५० महिला धावपटू सहभागी झाल्या.
श्वेता जैन यांनी स्पर्धा संचालक म्हणून काम पाहिले. मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी स्नेह फाउंडेशन, पीसीएमसी स्मार्ट सारथी आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
पदक विजेत्या धावपटू प्रथम, द्वितीय, तृतीय यानुसार पुढील प्रमाणे -
पाच किलोमीटर : वयोगट ४५ वर्षांपेक्षा कमी - वैष्णवी सरडे, ऋषा ओछानी, दीपाक्षी शृंगारे.
वयोगट ४५ वर्षांपेक्षा जास्त : प्राजक्ता राडके, राजश्री गायकवाड, अंजू सिंग. दहा किलोमीटर : वयोगट ४५ वर्षांपेक्षा कमी : शाबू गोसावी, अनन्या उपाध्याय, प्रियांका गुरुनानी. वयोगट ४५ वर्षांपेक्षा जास्त : धन्या कांबरथ, पूजा माहेश्वरी, असिता पवार.

PNE25U96449

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com