

पिंपरी, ता. १० : जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवडमधील स्वयंसिद्धा प्रतिष्ठान व रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. संगीता अहिवळे यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले, स्वयंसिद्धाच्या अध्यक्षा सविता इंगळे, स्वप्ना हजारे, डॉ. कामायनी सुर्वे, नंदकुमार मुरडे, दिनेश भोसले, डॉ. नीलकंठ डहाळे, पांडुरंग लोहटे आदी उपस्थित होते. सविता इंगळे यांनी प्रास्ताविकातून संस्थेची माहिती सांगितली. यावेळी निमंत्रित कवयित्रींच्या कविसंमेलनात चंचल काळे, सुनिती लिमये, चिन्मयी चिटणीस, प्रज्ञा भारस्वाडकर, एकता कारेगावकर, शोभा जोशी, माधुरी विधाते, रजनी आहेरराव, धनश्री गणात्रा, वृषाली वजरीनकर, सीमा गांधी, रेवती साळुंखे यांनी ‘स्त्री’ विषयावरील विविध कविता सादर केल्या. त्याचबरोबर मृणाल जैन, वैजयंती आपटे, जयश्री श्रीखंडे या कवयित्रींनीही कविता सादर केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.