रमजाननिमित्त अरबी खजूरांना मागणी
पिंपरी, ता. ९ : अरमान, सुलतान, केरमन, फरद, अजवा, साद, रुक्साना, मदजूल, रॉयल, किंग आदी प्रकारच्या खजूरांना पवित्र रमजान सणानिमित्त बाजारात मोठी मागणी आहे. तीनशे रूपयांपासून ते दोन हजार रूपये प्रतिकिलो भावाने खजूर पिंपरी बाजारात उपलब्ध असून उपवासासाठी मुस्लिम बांधव त्याचे मोठ्या आवडीने सेवन करत आहेत.
मुस्लिमांचा पवित्र मानला जाणारा महिना म्हणजे रमजान महिना. या महिन्यात मुस्लिम बांधवांमध्ये चैतन्याचे वातावरण असते. त्यामुळे मुस्लिम बांधव आतुरतेने याची वाट पाहतात. रोजाच्या सुरूवातीस पहाटे सुर्योदया अगोदर न्याहारी घेतली जाते. त्यानंतर सूर्यास्तापर्यंत खाणे - पिणे टाळतात. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेत खजूर खाऊन रोजा सोडला जातो. यावेळी फळांचे देखील सेवन करतात. यंदा पिंपरी बाजारपेठेत ४० ते ५० प्रकारचे खजूर उपलब्ध आहेत. पेंड खजूर, मगजोल, किमिया, यास्मिन, फर्द, कलमी, इराणी, सुशीला, गुलाबी, ग्रीन फर्द आदी खजूर बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. हे सर्व खजूर सौदी अरेबिया व आखाती देशातून भारतीय बाजारपेठेत विक्रीस येतात. बाजारात कमीत कमी ३०० रुपयांपासून तर जास्तीत जास्त २२०० रुपये खजूर विक्रीस उपलब्ध आहेत. यंदाच्या त्यांच्या भावात प्रतिकिलोमागे १० ते १५ रुपयांची दरवाढ झाली असून खजूर खरेदीसाठी पिंपरी बाजारपेठेमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे.
लाल, काळे खजूरही तेजीत
बाजारात लाल आणि काळ्या प्रकारच्या खजुरांनाही मागणी आहे. लाल खजूर ८० ते १०० रुपये किलो, काळा खजूर १२० ते ३०० रूपये किलो; तर अरेबियन खजूर सर्वात महाग म्हणजे ५०० ते १२०० रूपये किलो दराने विकले जात आहेत.
खजूरांचे प्रतिकिलो भाव
कलमी ६००, फुकरी ४००, मदजुल १२००, सफावी ३००, मगरूम ५००, मशरूफ ५००, किमीया ३००, बाम ३००, सुलतान २६०, अपू २००, रॉयल १६०, सुगाई ४७०, अज्वा जम्बो ८५०.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

