‘होळी करा लहान; पोळी करा दान’
पिंपरी, ता. १० ः ‘होळी लहान करा, पोळीचे दान करा,’ अपशब्द व शिव्या यांचे दहन करून चांगल्या गोष्टी व विचार याचे आचरण करा, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. होळीला वाहण्यात येणारी पोळी संकलित करण्याचा उपक्रम अंनिसच्या वतीने २६ वर्षांपासून देहूरोड येथे राबविण्यात येत आहे. संकलित करण्यात आलेल्या पुरणपोळीचे देहूरोड येथीलच गरीब वस्तीमध्ये ग्रामस्थांकडून वाटप करण्यात येते. याही वर्षी नागरिकांनी साधेपणाने घरगुती पर्यावरणपूरक होळी साजरी करावी. देहूरोड येथील चिंचोली येथे होणाऱ्या या पोळी संकलन उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

