‘आरटीई’ अंतर्गत २ हजार प्रवेश निश्चित
पिंपरी, ता.१० : प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेची मुदत सोमवारी (ता. १०) पर्यंत संपली. या मुदतीत २ हजार १०१ प्रवेश निश्चित झाले आहेत.
‘आरटीई’ अंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील मुलांना खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर विनामूल्य प्रवेश देण्यात येतो. या प्रवेशित मुलांच्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून शाळांना करण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेसाठी शहरातील १७० शाळांमधील ३ हजार ४३५ जागांसाठी १० हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले होते. त्यातून या प्रवेश प्रक्रियेसाठी २ हजार १०१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. अद्याप १ हजार १९२ विद्यार्थ्यांच्या जागा शिल्लक आहेत. यापूर्वी १४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ही मुदत वाढवून १० मार्च केली होती.
अर्जाची स्थिती तपासा...
‘आरटीई’ ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२५ - २६ या वर्षासाठी निवड यादीतील प्रवेशपात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर लघुसंदेश प्राप्त होतील. मात्र, पालकांनी केवळ त्यावर अवलंबून न राहता ‘आरटीई’च्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘अर्जाची स्थिती’ या पर्यायावर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रवेश निश्चित झाले आहे की नाही, याची खातरजमा करावी, असेही आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
प्रतिपूर्तीचा दर निश्चित
‘आरटीई’ अंतर्गत खासगी शाळांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीचा दर शालेय शिक्षण विभागाने निश्चित केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२४ - २०२५ या वर्षासाठी प्रति विद्यार्थी १७ हजार ६७० रुपये या दराने शुल्क प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे.
आकडे बोलतात...
उन्नत केंद्र / शाळा / एकूण जागा / प्रवेश / शिल्लक
पिंपरी - ६२ - ११४३ - ६८४ - ३७४
आकुर्डी - १०८ - २२९२ - १४१७ - ८१८
एकूण - १७० - ३४३५ - २१०१ - ११९२
सध्या आरटीई प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. दोन वेळा मिळालेल्या मुदतीमुळे अनेक पालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. काही पालकांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे काही प्रवेश शिल्लक आहेत.
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

