रस्त्यावरील खोदाईचा वाहनधारकांना त्रास
पिंपरी, ता. १० : केबल अथवा विविध कामांसाठी रस्ते खोदाई झाल्यानंतर खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. काही जण तात्पुरता उपाय करत आहेत. त्यामुळे खड्डे आणि रस्त्यावर खडी पसरत आहे. परिणामी वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. वाहने घसरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वाहनधारक संताप व्यक्त करत आहेत. मोशी परिसरासह पिंपरी चिंचवड शहरात हीच स्थिती आढळत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश ठिकाणी केबल टाकण्यासाठी अथवा विविध कामांसाठी रस्त्याची खोदाई केली जात आहे. काम पूर्ण झाल्यानंतर खोदण्यात आलेले चर, खड्डा बुजविला जात नाही. अनेक ठिकाणी खड्डे अर्धवट बुजविले आहेत. वाहनांची ये-जा झाल्यास अर्धवट बुजविलेल्या खड्ड्यातील खडी रस्त्यावर येऊन अपघातास निमंत्रण मिळत आहे. या खडीवरून दुचाकी वाहने घसरून अपघाताच्या शक्यता निर्माण होत आहेत. त्यामुळे खड्डे बुजविण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.
‘‘कामासाठी रस्त्याची खोदाई झाल्यानंतर ते बुजविले देखील पाहिजेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी खडी रस्त्यावर येत आहे. वाहने चालविताना अडथळे निर्माण होत आहेत. महापालिका अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला हवे.
- दिनेश मोरे, नोकरदार, मोशी.
फोटोः 96803
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

