

विकसित महाराष्ट्राचा ‘संकल्प’- आमदार लांडगे
पिंपरी, ता. १० ः राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. १०) विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला. त्याचे स्वागत करताना भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी प्रगतीशील आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प महायुती सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला असल्याचे मत व्यक्त केले.
महेश लांडगे म्हणाले, ‘‘उद्योग- रोजगार, पायाभूत सुविधा - वाहतूक, कृषी - जलसंधारण, हरित अनुकूल प्रकल्प, सहकार आणि ग्रामीण विकास यासह महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना, प्रकल्प आणि कार्यक्रम असलेला सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने तो जाहीर केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्वकांक्षी घोषणा केल्या आहेत. नवीन औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून ४० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचा संकल्प सरकारने केला आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.