खोटा रहिवासी पुरावा, १८ पालकांवर गुन्हा
पिंपरी, ता. १० : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) पाल्यांच्या प्रवेशासाठी खोटा रहिवासी पुरावा सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी १८ पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. हा प्रकार जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत भूगाव येथील माताळवाडीमध्ये घडला.
सचिन चंद्रकांत भोसले , खंडू दिलीप बिरादार, रामकृष्ण तानाजी चोंधे, सुमीत सुरेश इंगवले, विजय सुभाष जोजारे, मंगेश गुलाब काळभोर, रोहिदास मारुती कोंढाळकर, श्रीधर बाबूराव नागुरे, बाबासाहेब छबूराव रंधे, विलास रामदास साळुंखे, गणेश राजाराम सांगळे, रूपेश बाळकृष्ण सावंत, दिगंबर पंडित सावंत, चंदन अंकुश शेलार, कुंभराम सांगिलाल सुतार, मंगेश झबुलाल गुरव, विवेक जयवंत जोरी, उमेश हिरामण शेडगे अशी गुन्हा दाखल झालेल्या पालकांची नावे आहेत. याप्रकरणी मुळशीच्या गट शिक्षण अधिकारी सुजाता देशमाने यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुळशी तालुक्यातील काही खासगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने केलेल्या छाननीत १८ पालकांनी त्यांच्या पाल्यांचा खोटा रहिवासी पुरावा सादर करून, २५ टक्के अंतर्गत प्रवेश घेतल्याचे समोर आले. त्यानंतर शिक्षण विभागाकडून संबंधित पालकांबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली.
------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

