महावितरणच्या पिंपरीतील दोन उपकेंद्रांना ‘आयएसओ’
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १४ : महावितरणच्या पिंपरी विभागातील गणेशम् स्विचिंग स्टेशन व म्हाडा उपकेंद्रांना आयएसओ मानांकन मिळाले. मोरवाडी येथे आयोजित कार्यक्रमात मंगळवारी (ता. ११) या दोन्ही उपकेंद्रांना मुख्य अभियंता राजेंद्र पवार व ‘आयएसओ’चे परीक्षक नंदकुमार देशमुख यांच्याहस्ते मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे उपस्थित होते.
‘आयएसओ’च्या पथकांनी या दोन्ही उपकेंद्रांना नुकतीच भेट दिली. यावेळी २७ अटी व शर्तींच्या मानकांप्रमाणे तपासणी करुन उपकेंद्रांची गुणवत्ता, कामकाजाचा दर्जा, सर्व प्रकारची सुरक्षा उपाययोजना व उपकरणांची उपलब्धता, पर्यावरण दस्ताऐवजीकरण, वैद्यकीय सुविधा, सुशोभीकरण आदी निकषांच्या आधारे दोन्ही उपकेंद्राना मानांकन दिले. आतापर्यंत पुणे परिमंडलातील नऊ उपकेंद्रांनी ‘आयएसओ’चे प्रमाणपत्र मिळविले आहे. या उपकेंद्रांच्या आधुनिकीकरणासोबतच त्याची योग्य निगा, दर्जा व व गुणवत्ता अबाधित ठेवण्याचे निर्देश पवार यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

