

पिंपरी, ता. १२ : पिंपरी-चिंचवड अपर तहसीलच्या नव्या कार्यालयासाठी अनेक जागांचा विचार होत आहे. सुरुवातीला चिखली येथील जागेबाबत प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात आला होता. त्यावर निर्णय न झाल्याने परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. तर, रावेत येथील निवडणुकीचे साहित्य ठेवण्यासाठी असलेल्या गोडाऊनच्या जागेवरही कार्यालय सुरू करण्याचा शासनाचा विचार असल्याचे समोर आले आहे.
शहराची लोकसंख्या २७ लाखांच्या पुढे गेल्यानंतर निगडी येथे स्वतंत्र अपर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले आहे. सध्या निगडी येथील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयातील एक मजला अपर तहसीलसाठी देण्यात आला आहे. पण, या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या तसेच इतर साधनसामग्री ठेवण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. २०१३ पर्यंतचे शहरातील दस्तऐवज अद्याप हवेली तहसिल कार्यालयातकडेच आहे. निगडी येथील कार्यालयाला अपुरी जागा असल्याने ते दस्तावेज अद्याप आणले जात नसल्याचे चित्र आहे. अपुरे कर्मचारी आणि कार्यालयाची अडगळीची जागा, अशा अवस्थेत सध्या निगडीतील अपर तहसील कार्यालयाचे कामकाज सुरू आहे.
गेल्या काही वर्षांपासून सुसज्ज कार्यालय निर्मितीसाठी जागेचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी चिखली येथील २० गुंठे जागेचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात आला आहे. तो अजूनही पडून असल्याचे चित्र आहे. तसेच रावेत येथे निवडणुकीच्या कामासाठी दिलेल्या गोडाऊनची जागा पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) आहे. ही जागा तहसील कार्यालयाला मिळण्याबाबत कार्यालय विचाराधीन आहे. त्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पिंपरी-चिंचवडचे अपर तहसीलदार जयराज देशमुख यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.