

देहू, ता.१२ ः जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा अवघ्या तीन दिवसांवर असल्याने राज्य शासनाच्या विविध खात्यांकडून भाविकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी लगबग सुरू आहे. आरोग्य विभागाच्यावतीने भाविकांच्या आरोग्यासाठी पाच ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय गावातील खासगी रुग्णालयातील १० टक्के खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर यादव यांनी दिली.
यावेळी डॉ.मेघा पदमने या उपस्थित होत्या. यंदा संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याचे त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव असल्याने भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना आरोग्य सुविधा वेळेत मिळाव्यात म्हणून देहूत विविध पाच ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आले आहे. मुख्य देऊळवाडा, गाथा मंदिर परिसर, संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्याच्या ठिकाणी एकेक बाह्यरुग्ण विभागाची व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरातील गावात माळवाडी आणि गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे देखील बाह्यरुग्ण विभाग सुरू झाले आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी रुग्णांसाठी सहा खाटा उपलब्ध आहेत. तर गावातील खासगी रुग्णालयांत १० टक्के खाटा राखीव ठेवण्यात येणार आहे.
रुग्णवाहिकांची व्यवस्था
तत्काळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी एक ह्दयविकारग्रस्तांसाठी (कार्डियाक) रुग्णवाहिका आहे. तर गावातील विविध ठिकाणी चार रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहेत. आरोग्य सेवेसाठी पाच वैद्यकीय अधिकारी, आठ आरोग्य सहाय्यक, १० आरोग्य सेवक, १० परिचारिका असे एकूण ४० कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. पुरेसा औषध पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात्रा काळात विविध ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॅाल्स असतात. तेथील अन्नपदार्थ तपासणीसाठी पथक तयार करण्यात आले आहे. तसेच हॅाटेल्समधील अन्नपदार्थ तपासण्यासाठी इतर चार पथके तैनात करण्यात आली आहेत.
PNE25U97301
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.