

देहू, ता. १२ ः देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्षपद आणि सहा विश्वस्त पदांसाठी येत्या ३१ मार्चला निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता.१३) उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. अध्यक्षपदाच्या दोन वर्षांच्या तर विश्वस्तपदाच्या सहा वर्षांच्या कार्यकाळासाठी ही निवडणूक होत आहे.
संस्थानच्या विद्यमान अध्यक्ष आणि विश्वस्त यांची मुदत ३१ मार्चला संपत आहे. या पार्श्वभूमीवर संस्थानचा निवडणूक कार्यक्रम राबविला जात आहे. शुक्रवारी (ता.१४) उमेदवारी अर्जांची छाननी होईल. सोमवार (ता.१७) ते शनिवार (ता.२२) मार्च सकाळी ११ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. उमेदवारांना रविवारी (ता.२३) सकाळी दहा वाजता चिन्हांचे वाटप होईल. सोमवार (ता.३१) मार्चला सकाळी ८ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुकुंदलाल पित्ती धर्मशाळेत मतदान होईल. याच दिवशी सायंकाळी सहानंतर मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश मोरे यांनी दिली.
संस्थानच्या तीन शाखांतून प्रत्येकी दोन असे एकूण सहा विश्वस्त निवडले जातात. आबाजी बुवा शाखेत ९० मतदार, गणेशबुवा शाखा क्रमांक दोनमध्ये १४१ तर गोविंदबुवा शाखा क्रमांक तीनमध्ये १४७ मतदार आहेत. यंदा अध्यक्षपदासाठी गोविंदबुवा शाखेतून उमेदवार निवडला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.