ओला, सुका कचऱ्यावर नवउद्योजकांनी संशोधन करा

ओला, सुका कचऱ्यावर नवउद्योजकांनी संशोधन करा
Published on

पिंपरी, ता. १४ ः ‘‘आपले पारंपरिक ऊर्जास्रोत हे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. पुण्यासारख्या शहरात प्रचंड ओला आणि सुका कचरा गोळा होतो. त्याच्यातून काही नवीन ऊर्जा तयार करता येईल, यावर काम करण्यास नवउद्योजकांनी करावे,’’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी केले.
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर अॅप्लीकेशन अॅण्ड मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली. टीसीएस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमर शेठीया, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे डॉ. विजय खरे, डीवायपीआयएमएसच्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका (क्वॉलिटी अॅश्युरंस), डॉ. श्वेता चव्हाण पाटील, संचालक डॉ. जयसिंह पाटील, डी. वाय. पी. ई. आर. एफच्या संचालिका डॉ. के निर्मला, डॉ. ललित प्रसाद आदी उपस्थित होते. अमर सेठिया म्हणाले, ‘‘शाश्वत विकास हा वेष्ट मॅनेजमेंटपासून चालू केला पाहिजे, की ज्यामधून नवीन विद्युत ऊर्जा निर्माण केली पाहिजे. शेती क्षेत्रामध्ये देखील सेंद्रिय शेतीचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून रासायनिक खतांचा वापर टाळून शेती उत्पादन घेतले पाहिजे, प्रत्येक उद्योजकाने पर्यावरणपूरक ग्राहकोपयोगी वस्तू बनविल्या पाहिजेत.’’
डॉ. जयसिंह पाटील म्हणाले, ‘‘आपण छोट्या-छोट्या गोष्टींमधून पर्यावरणाची हानी टाळू शकतो. विजेची बचत प्लास्टिकचा वापर टाळणे, आदी गोष्टी या दैनंदिन जीवनात केल्या तरीदेखील शाश्वत विकासास हातभार लागेल.’’
डॉ. विजय खरे म्हणाले, ‘‘इस्राईल हा देश पुढील पाच वर्षांमध्ये प्रोटिनच्या गोळ्या निर्माण करून विकणार आहे. म्हणजेच आपल्या भारतातील पोल्ट्री व्यवसाय हा अडचणीत येऊ शकतो. ’’
या परिषदेमध्ये सर्वोत्कृष्ट शोधनिबंधाच्या पारितोषिकांचे हस्ते वितरण करण्यात आले. ‘फायनांन्स’मध्ये डॉ. गणेश लांडे, प्रा. महेश महंकाल, डॉ. विद्या भांडवलकर, प्रा. प्रतीक वडगावकर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये प्रा. वैशाली बारसे, ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये प्रा. शिल्पा कुलकर्णी व डॉ. एम. एम. मुनसी, मार्केटिंगमध्ये प्रा. मेघश्याम चौधरी, डॉ. मीनल पेंडसे, डॉ. रोहन दास, जनरल मॅनेजमेंटमध्ये रोहीत मल्होत्रा आणि ऑपरेशन मॅनेजमेंटमध्ये शैलेश नातू है सर्वोत्कृष्ट शोधनिबंधाच्या पारितोषिकांचे मानकरी ठरले. सूत्रसंचालन प्रा. राणी थॉमस आणि प्रा. मीनल वाघ यांनी केले. आभार डॉ. कविता सूर्यवंशी यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com