देहू परिसरातील वाहतुकीत आजपासून बदल

देहू परिसरातील वाहतुकीत आजपासून बदल
Published on

पिंपरी, ता. १४ : श्री क्षेत्र देहू येथे रविवारी (ता.१६) जगद्गुरू श्री तुकाराम महाराज बीज सोहळा साजरा होत आहे. यासाठी राज्यभरातून भाविक देहूत दाखल होत असतात. या सोहळ्यादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शनिवार (ता. १५) ते सोमवार (ता. १७) सायंकाळी चार वाजे पर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होई पर्यंत असेल, देहू परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

बंद असणारा रस्ता आणि पर्यायी मार्ग
जुन्या मुंबई -पुणे महामार्गावरील देहूफाटा येथील कमानीपासून देहूगावकडे येणारा मार्ग सर्व वाहनासाठी बंद राहणार आहे. (सार्वजनिक वाहतूक बसेस व दिंडीतील वाहने वगळून) तसेच महिंद्रा सर्कलकडून फिजुत्सु कॉर्नर अथवा कॅनबे चौक /आयटी पार्क चौकाकडे येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांस प्रवेश बंद राहणार असून या मार्गावरील वाहने महिंद्रा सर्कल निघोजे मोईफाटा डायमंड चौकमार्गे इच्छित स्थळी जातील.
तळेगाव-चाकण मार्गावरील देहूफाटा येथून देहूगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहने एचपी चौकमार्गे इच्छित स्थळी जातील.
यासह देहू कमान चौदा टाळकरी कमान इंद्रायणी पूल हॉटेल कॉर्नर दरम्यानचा रस्ता, १४ टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक दरम्यानचा रस्ता, खंडेलवाल चौक ते देहुकमान (मुख्य) ते परंडवाल चौक रस्ता बंद राहणार आहे. जुना पालखी मार्ग (कंद पाटील चौक) ते झेंडे मळा (जकात नाका) जाणारी वाहतूक वन-वे करण्यांत येत असून झेंडे मळ्‌याकडून कंद पाटील चौकाकडे जाण्यास मनाई असेल.
-----------------------

येथे असेल पार्किंग

- आळंदी-तळवडे कडून येणाऱ्या वाहनांसाठी माऊली वजन काटा, काळोखे पाटील चौक येथे व गायरान पार्किंग देहू येथे पार्किंग असेल .
- गायरान पार्किंग देहू येथे पीएमपीएल बस थांबा आहे.
- देहू कमान देहूरोड ते देहूगावकडे येणाऱ्या वाहनांसाठी राधाकृष्ण लॉन्सच्या शेजारील सीओडीच्या जागेत पार्किंगची सोय असेल.
- चाकण-तळेगांव रोडवरील देहूफाटा येथून देहूगांवकडे येणाऱ्या वाहनांसाठी सप्तपदी लॉन्स, येलवाडी शॉपिंग कॉम्प्लेक्स, दिगंबरा डेव्हलपर्स व भगिरथी लॉन्स येथे पार्किंगची सोय असेल.
- साईराज चौक ते देहूफाटा या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या हॉटेल शॉपिंग कॉम्प्लेक्स यांच्या जागेत वाहने पार्क करता येतील.
हा बदल शनिवारी (ता. १५) ते सोमवारी (ता. १७) सायंकाळी चार वाजेपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत असेल.
----------
गहुंजे परिसरातील वाहतुकीतही बदल

पिंपरी, ता. १४ : गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये रविवारी (ता.१६) एका सांस्कृतिक आयोजन केले आहे. या दरम्यान परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी परिसरातील वाहतुकीत रविवारी बदल करण्यात आला आहे.

- मुंबईकडून येणाऱ्या प्रेक्षकांनी द्रुतगती मार्गाच्या देहूरोड एक्झिटमधून बाहेर पडल्यानंतर मामुर्डीगावाच्या सेवा रस्त्याने स्टेडियमकडे व पाकिंगकडे जावे.
- द्रुतगती मार्गावरुन येणारी वाहने किवळे पुलावरुन मुकाई चौक येथून यू-टर्न घेऊन कृष्णा चौक मार्ग द्रुतगती मार्गा लगतच्या सिम्बॉयसेस कॉलेजच्या बाजूकडील सेवा रस्त्याने स्टेडियमकडे जातील.
- शीतळादेवी मंदिर येथून डाव्या बाजूस वळवून लेखा फार्ममार्गे असलेल्या सेवा रस्त्याने स्टेडियमकडे जावे.
- सेंट्रल चौक मार्गे मुकाई चौकात येणारी वाहने किवळे पुला खालून कृष्णा हॉटेल शेजारून मामुर्डी भुयारी मार्गाच्या डाव्या बाजूने जातील.
- जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन येणारी वाहने सेंट्रल चौक येथून यु टर्न घेवून साई नगर फाटा मार्गे पार्किंग ठिकाणी जातील.
- पुणे बाजूकडून येणारी वाहने पुणे बंगळुरू महामार्गावरुन किवळे पुलावरुन डाव्या बाजूकडे वळवावी व द्रुतगती मार्गाचे डाव्या बाजूने सेवा रस्त्याने स्टेडियमकडे जातील.
-निगडी, हँगिंग ब्रिजकडून येणारी वाहने रावेत चौक, भोंडवे चौक, मुकाई चौक मार्ग कृष्णा चौक येथून उजव्या बाजूस वळून पुन्हा द्रुतगती मार्गापासून डाव्या बाजूस वळून जातील.
- कृष्णा चौक ते मामुर्डी भुयारी मार्गाने तसेच जुन्या पुणे मुंबई महामार्गा शेजारील मामुर्डी गावचे बाजूस असलेल्या सेवा रस्त्याने गहुंजे स्टेडियमकडे जाण्या-येण्यास सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना प्रवेश बंद असेल.
हा बदल रविवारी दुपारी एक ते रात्री बारा या वेळेसाठी असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com