‘आरटीई’ शुल्क परतावा कधी मिळणार?

‘आरटीई’ शुल्क परतावा कधी मिळणार?
Published on

पिंपरी, ता. १४ : शहरातील शाळांमध्ये ‘आरटीई’ कायद्यांतर्गत तीन हजारांवर विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गात प्रवेश देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. गेल्या वर्षी संस्था चालक न्यायालयात गेल्यामुळे प्रवेशाला उशीर झाला होता. यंदाही स्थिती फारशी चांगली नाही. ‘आरटीई’चे शहरातील शाळांचे मागील सहा वर्षांपासून कोटी रुपये थकीत असल्यामुळे नेमके काय करावे, तेच संस्था चालकांना सुचेनासे झाल्याची परिस्थिती आहे.
शहरात शाळांचे ‘आरटीई’ अंतर्गत जी परतावा रक्कम थकीत आहे, तिच्याबाबत शासनाकडून अवाक्षरही काढण्यात आले नाही. त्यामुळे इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल्स असोसिएशन ‘आरटीई’च्या २५ टक्के प्रवेशित विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी शुल्क घेण्याचा व ज्यावेळी शासन त्या वर्षातील शुल्काची प्रतिपूर्ती करेल, त्यावेळी ते पालकांना परत देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सहा वर्षांपासून शासनाने ‘आरटीई’च्या २५ टक्के प्रवेशित विद्यार्थ्यांचे शुल्कच दिले नसल्याने त्यांना प्रवेश देणाऱ्या शाळा आर्थिक अडचणीत आल्या आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असून, त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांना दर्जेदार सोयी पुरवणे, भौतिक सुविधा देणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन देणे संस्थाचालकांना अडचणीचे झाले आहे.

प्रतिपूर्ती त्याचवर्षी मिळावी
‘आरटीई’ कायद्यानुसार ज्या वर्षाची प्रतिपूर्ती त्याच वर्षी ३१ मार्चपूर्वी देणे आवश्यक आहे. परंतु, शासनाकडून २०१९-२० च्या शैक्षणिक सत्रापासून ते अद्याप प्रतिपूर्ती मिळाली नाही. चालू शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पालकांकडून शैक्षणिक शुल्क घेतले जाईल. ज्यावेळी शासन या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती करेल त्यावेळी पालकांना ते परत केले जाईल. यात शाळेचे आणि विद्यार्थ्यांचेही नुकसान होणार नाही.

ज्या शाळांमध्ये ‘आरटीई’अंतर्गत विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहेत. त्या शाळा त्यांनी ठरवल्यानुसार शैक्षणिक शुल्क घेतील. ज्यावेळी शासन प्रतिपूर्ती शाळेला देईल, त्यावेळी हे शुल्क पालकांना परत केले जाईल. कारण, शाळांनाही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे लागते.
- जागृती धर्माधिकारी, प्रदेशाध्यक्ष इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल्स असोसिएशन (IESA)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com