पीएमपीची गुरूवारी विशेष दर्शन बस यात्रा

पीएमपीची गुरूवारी विशेष दर्शन बस यात्रा
Published on

पिंपरी, ता. १४ : पर्यटन बस सेवा उपक्रमांतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्‍या (पीएमपीएमएल) वतीने विशेष दर्शन बस यात्रेचे नियोजन केले आहे. गुरूवारी (ता. २०) स्‍वारगेटवरून ही बस सकाळी साडेआठ वाजता रवाना होणार आहे. या बससेवेत पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख मंदिरांसह आळंदी येथे संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज, देहू येथे संत श्री तुकाराम महाराजांचे दर्शन घेता येणार आहे. गुरूवारी (ता. २०) स्‍वारगेटवरून ही बस रवाना होणार आहे. ही बस चिंचवड येथील मोरया गोसावी समाधी मंदिर, रावेत येथील इस्‍कॉन मंदिर, शिरगाव येथील श्री साई मंदिर प्रतिशिर्डी, देहू येथील विठ्ठल मंदिर, वैकुंठ गमन मंदिर, गाथा मंदिर, आळंदी येथील गजानन महाराज मठ, संजीवन समाधी मंदिर आदी ठिकाणी थांबणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com