

पिंपरी, ता.१४ : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराला अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांचा अभिप्राय अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छ सर्व्हेक्षणात अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ ही स्पर्धा देशभरातून घेतली जात आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका या स्पर्धेत सामील झाली आहे. या स्पर्धेसाठी नागरिकांचे अभिप्राय महत्वाचे असून त्यास अतिरिक्त गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाने आपला स्वच्छतेविषयक अभिप्राय देणे महत्त्वाचे आहे.
दरम्यान, ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ च्या अनुषंगाने आरोग्य विभागाकडून घराघरातील कचरा संकलित करून त्यावर पुढील योग्य ती प्रक्रिया केली जात आहे. नागरिकांमध्ये ओला, सुका कचरा विलगीकरण, होम कम्पोस्टिंग, कापडी पिशव्यांचा वापर या विषयी जनजागृती करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम देखील राबवण्यात येत आहेत.
चौकट :
सर्वप्रथम https://sbmurban.org/feedback या संकेतस्थळावर जावे.
त्यानंतर स्वतःचा मोबाइल क्रमांक टाका आणि पसंतीची भाषा निवडा.
‘राज्य’ या पर्यायात ‘महाराष्ट्र’ आणि ‘जिल्हा’ या पर्यायात ‘पुणे’ निवडा
यूएलबी पर्यायात ‘पिंपरी चिंचवड’ निवडा
त्यानंतर प्रश्नांची योग्य उत्तरे द्या
मोबाइलवर येणारा ओटीपी टाकून अर्ज सबमिट करा
कोट
शहराला ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ मध्ये अव्वल क्रमांक मिळावा, यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रम राबवले जात आहेत. या स्पर्धेत ‘नागरिकांचा अभिप्राय’ यासाठी देखील गुण राखीव ठेवण्यात आले आहेत.
-शेखर सिंह, आयुक्त महानगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.