

पिंपरी, ता. १४ : पिंपरी चिंचवड शहरातील तापमानात सतत वाढ होत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण येण्याची आणि गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेऊन, संभाव्य धोक्यांपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबीयांचे संरक्षण करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने नागरिकांना करण्यात आले आहे. नागरिकांनी काय काळजी घ्यावी आणि काय नको, या बाबत महापालिकेने काही सूचना केल्या आहेत.
हे अवश्य करा -
- तहान नसतानाही भरपूर पाणी प्या.
- हलके, पातळ व सछिद्र सुती कपडे वापरा.
- बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी, बूट आणि चपलांचा वापर करावा.
- प्रवासात पाण्याची बाटली सोबत ठेवा.
- उन्हात काम करणाऱ्यांनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावे.
- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक आदीचा वापर करा.
- अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे ओळखावीत. चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- पाळीव प्राण्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे व सावलीत ठेवावे.
- घरातील वातावरण थंड ठेवण्यासाठी पंखे, कुलर, वाळयाचे पडदे व सनशेडचा वापर करा. रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
- थंड पाण्याने स्नान करा.
- कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा.
- सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करा.
- लहान मुले, गर्भवती, ज्येष्ठ व आजारी व्यक्तींची अधिकची काळजी घेण्यात यावी.
- रस्त्यांच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरीता सावलीचा आधार घ्यावा.
- आवश्यक तेवढाच व्यायाम करावा, अतिश्रम टाळावे.
हे अवश्य टाळा -
- लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
- दुपारी बारा ते चार या कालावधीत उन्हात जाणे टाळा.
- गडद रंगाचे, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
- बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरीक श्रमाची कामे टाळा.
- उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक टाळा. मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.