कुऱ्हाड व कोयत्याने वाहनांची तोडफोड टोळक्याकडून मोशीत प्रकार

कुऱ्हाड व कोयत्याने
वाहनांची तोडफोड 
टोळक्याकडून मोशीत प्रकार
Published on

पिंपरी, ता. १४ : दुचाकीच्या सायलेन्सरमधून मोठा आवाज काढण्यास विरोध केल्याने सात जणांच्या टोळक्याने कुऱ्हाड व कोयत्याने तीन वाहनांची तोडफोड केली. तसेच एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मोशीतील सस्तेवाडी येथे घडली.
याप्रकरणी दिनेश जालिंदर सस्ते (रा. सस्तेवाडी, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साहिल संपत भोर (वय १९, रा. चऱ्होली), रोहित एकनाथ इंगोले (वय १९, रा. आळंदी), अभय सुभाष काळेल (वय २२, रा. चऱ्होली), अनिल प्रकाश राठोड (वय २७, रा. डुडुळगाव), रामेश्वर श्याम टेकाळे (वय २०, रा. आळंदी), चैतन्य लक्ष्मण पांचाळ (वय २०, रा. केळगाव) व शुभम नागनाथ कुंभार (वय २०, रा. केळगाव) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी हे त्यांचे नातेवाईक व मित्रांसह सस्तेवाडी तालीम येथे गप्पा मारत थांबले होते. दरम्यान, आरोपी हे दुचाकीच्या सायलेन्सरमधून मोठा आवाज काढत असल्याने फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी त्यास विरोध केला. यावरून आरोपी काही वेळाने पुन्हा पाच दुचाकीवरून आले. त्यांच्याकडे कुऱ्हाड व दांडके होते. ‘आम्ही येथील दादा आहोत, तुम्हाला जास्त मस्ती आली आहे’ असे म्हणत कुऱ्हाड, कोयते, दांडक्याने एका मोटारीसह दोन दुचाकींची तोडफोड करून नुकसान केले. त्यानंतर काळेल, राठोड, पांचाळ व कुंभार यांनी हत्यार हातात घेऊन फिर्यादी यांचा पाठलाग केला. भोर, इंगोले व कुंभार यांनी तेथील वॉशिंग सेंटरवर काम करणारा अंकित दिवाकर यास जीवे मारण्याच्या उद्देशाने दांडक्याने बेदम मारहाण केली.
-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com