गणिताला मित्र मानल्यास शिकणे सोपे

गणिताला मित्र मानल्यास शिकणे सोपे

Published on

पिंपरी, ता. १७ ः ‘‘गणिताची मूलभूत संकल्पना आपल्या मनात स्पष्ट नसते. त्यामुळे गणित हा अवघड विषय ठरतो. त्यामुळे त्याचा बाऊ न करता गणित हा मनोरंजक विषय आहे व आपला मित्र आहे, असे मानल्यास हा विषय सोपा जाणार आहे. उत्तम गणित येण्यासाठी २०० दिवसांचा संयम व सराव करण्याची तयारी असेल; तर यश तुमचेच आहे.’’, असा सल्ला भांडारकर ॲकेडमीचे संस्थापक संचालक अभिजित भांडारकर यांनी दिला.
‘सकाळ विद्या’ आणि भांडारकर ॲकेडमी यांच्यावतीने निगडी प्राधिकरण येथील ग.दि.माडगूळकर नाट्यगृहात
इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी (ता.१६) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या चर्चासत्राला संदीप जाधव, स्वप्नील भांडारकर, मनोज भांडारकर यांच्यासह विद्यार्थी व पालकांनी मोठी उपस्थिती लावली.
इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना अवघड जाणारा विषय म्हणजे गणित. गणितात कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रगती पत्रकावरील टक्का कमी होतो. मात्र, याच विषयात जर विद्यार्थी निपुण झाला; तर त्याचा इतर विषयांमध्येही आत्मविश्‍वास वाढतो. तसेच कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचे असेल; तर गणित विषय अभ्यासक्रमात असतोच. त्यामुळे या विषयाची भीती घालविण्यासाठी हा विषय सोप्या पद्धतीने कसा आत्मसात करता येईल ? त्यासाठी ‘फॉर्म्युला साँग’ सारखे तंत्र कसे अवगत करायचे ? त्याचा सराव कसा करायचा ? अशा अनेक बाबींवर भांडारकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आपल्या सादरीकरणाच्या माध्यमातून भांडारकर यांनी विद्यार्थ्यांकडून थेट सूत्र पाठांतराचा सराव करून घेतला. गणितामधील क्लिष्ट सूत्रे पाठ करण्याची व सोडविण्याची पध्दत त्यांनी यावेळी सांगितली. तसेच त्यांनी तयार केलेल्या गणिताच्या सांगीतिक फॉर्म्युलाचाही सराव घेतला.
गणितात आलेले अपयश, अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना करावा लागलेला संघर्ष, फॉर्म्युला साँग संकल्पनेची सुरूवात, ती शिकविण्याची पद्धत कोणती ? यातील सूत्रांचा लिहिण्याचा सराव कसा करायचा ?, आकृत्यांचा सराव कसा करायचा ?, भांडारकर ॲकेडमीमध्ये नक्की काय शिकविले जाते ? याबाबतची माहिती भांडारकर यांनी दिली. चर्चासत्राच्या शेवटी भांडारकर ॲकेडमीत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी अनुभव कथन केले. तर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना भांडारकर यांनी उत्तरे दिली. संदीप साकोरे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com