

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १८ : पिंपरी गावातील पवनेश्वर उद्यान मद्यपींचा अड्डा झाला असून रोज सायंकाळी येथे गोंधळ सुरू असतो. त्यामुळे पवनेश्वर मंदिरासह जॉगिंगसाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मद्यपींवर पोलिस आणि पालिकेच्या उद्यान विभागाने तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरातील उद्यानांची नियमित साफसफाई, झाडांची देखभाल दुरुस्ती, सुरक्षा व्यवस्था आदी जबाबदारी ठेकेदारांवर सोपविली आहे. पिंपरी गावठाणमध्ये पवनेश्वर मंदिर आहे. त्याला लागूनच पवनेश्वर उद्यान आणि विसर्जन घाट आहे. उद्यानात लहान मुलांसाठी विविध खेळणी येथे आहेत. मात्र, यातील बहुतांश वस्तूंची मोडतोड झाली आहे. तसेच येथे जॉगिंग ट्रॅक असल्याने दररोज मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागिरक, महिला येतात. दरम्यान, येथे सुरक्षा रक्षक नसल्याने मद्यपींचा वावर वाढला आहे. रात्री उद्यान बंद करण्यासाठी कोणीच नसल्यामुळे आणि कुलूप लावण्याची व्यवस्था नसल्यामुळे ते रात्रभर खुलेच असते. त्यामुळे सायंकाळी सातनंतर उद्यानात मद्यपींची ‘बैठक’ सुरू असते. पालिका प्रशासनाने येथे सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी. मद्यपींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
उद्यानात मद्यपींचा वावर असतो. तसेच काही वेळी जोडप्यांचे चाळे सुरू असतात. त्यामुळे आम्हाला उद्यानात जाताना नकोसे वाटते. प्रशासाने तत्काळ दखल घेऊन उपाययोजना कराव्यात.
- अनिता पाटील, गृहिणी
पवनेश्वर उद्यान छोटे असल्यामुळे पालिकेच्या अटी-शर्तीमुळे तेथे सुरक्षा रक्षक नेमता येत नाही. सुरक्षा विभागाकडे पुन्हा एकदा पत्रव्यवहार करुन लवकरच तेथे सुरक्षा रक्षक नेमला जाईल.
- उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त उद्यान विभाग
ठळक मुद्दे
- उद्यानात सुरक्षारक्षक नाही
- गेट लॉक करण्याची व्यवस्था नाही
- उद्यानातील खेळणी तुटलेल्या
- विसर्जन घाट आणि उद्यानात मद्यपींचा वावर
- उद्यानात मद्याच्या बाटल्यांचा खच
फोटो - ९८४६७, ९८४६९, ९८४७०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.