

पिंपरी, ता. १८ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (पीएमआरडीए) प्रशासकीय इमारतीत चित्रफीत उभारली जाणार आहे. यामाध्यमातून पीएमआरडीएने उभारलेले प्रकल्प, गृहरचना सोसायटी आणि उड्डाणपूल याची माहिती नागरिकांपर्यंत पोचविण्यात येणार आहे. पीएमआरडीए कार्यालयाचा तळमजला त्याचप्रमाणे आयुक्तांच्या कक्षाबाहेर असलेल्या प्रतिक्षालय कक्ष या दोन ठिकाणी चित्रफीत उभारण्याचे काम सुरू आहे. सोमवारपासून (ता. १७) सुरुवात झाली.
पीएमआरडीएच्या सेक्टर १२, ३०-३२ या ठिकाणाचे गृहप्रकल्प, उड्डाणपूल, रस्ते, विकास कामे आणि मोशी येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर त्याची माहिती या चित्रफीत अंतर्गत दाखविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वेगवेगळे नागरिक, ग्रामस्थ वेगवेगळ्या कामासाठी पीएमआरडीए कार्यालयात येत असतात. अनेकदा या कार्यालयाची नेमकी माहिती नागरिकांना नसते. त्यामुळे आत्तापर्यंत केलेल्या कामाची माहिती पोहोचण्याचा हा उद्देश असल्याचे प्राधिकरणातील विद्युत विभागाच्या वतीने सांगण्यात आले. कार्यालयात आल्यानंतर तळमजल्यावर असलेल्या प्रतिक्षागृहामध्ये अनेक नागरिक थांबलेले असतात. त्यामुळे त्यावेळी मध्ये नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी येथे ही चित्रफीत उभारली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.