चॅरिटेबल ट्रस्टमधून रुग्णांना अर्थसहाय्य करा

चॅरिटेबल ट्रस्टमधून रुग्णांना अर्थसहाय्य करा
Published on

पिंपरी, ता. १८ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना मिळण्यासाठी आयुक्तांच्या स्वाक्षरीने अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. आयुक्‍त शेखर सिंह यांना पाठविलेल्‍या पत्रातून ही सूचना केली आहे. महापौर नसल्‍याने सध्या या ट्रस्‍टमधून निधी वितरीत केला जात नाही. या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांनी सूचना केली.
आमदार लांडगे यांनी दिलेल्‍या पत्रात नमूद केले आहे की, शहरातील सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकर रुग्णांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने चार सप्टेंबर १९९१ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिका चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली आहे. याद्वारे वैद्यकीय मदतीसोबतच नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्तीमध्ये गोरगरिबांना मदत करण्याचे धोरण आहे. या ट्रस्टवर महापौर यांची पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नियुक्ती होते. मात्र, मार्च २०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपल्‍याने सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. ‘महापौर’ अभावी गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत मिळत नाही. मदतीच्या धनादेशावर महापौरांची स्वाक्षरी लागते. महापालिका अधिनियमातील संबंधित अटी-शर्तीच्या आधारे नवीन महापौर नियुक्त होईपर्यंत आयुक्त तथा प्रशासक म्हणून आपल्या स्वाक्षरीने किंवा अतिरिक्त आयुक्तांच्या स्वाक्षरीने रुग्णांना आर्थिक मदत मिळण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी. महापालिकेच्या जानेवारी २०२२ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत आर्थिक मदतीची रक्कम पाच हजार रुपयांवरुन १५ हजार रुपयांवर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. ती देखील केली जावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com