

दोन गटांत हाणामारी, चिखली येथील प्रकार
पिंपरी, ता.१८ : किरकोळ कारणावरून दोन गटांत मारहाण झाली. ही घटना चिखली येथे घडली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अक्षय जाधव (वय २६, रा. रुपीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अजय हरिजन (वय २५, रा. मोरेवस्ती चिखली) आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. अजय आणि त्याच्या दोन साथीदारांनी फिर्यादी अक्षय यांच्या नातेवाईकाला शिविगाळ केली. हे वाद मिटवण्यासाठी फिर्यादी गेले असता, आरोपीने दगड मारला आणि साथीदारांनी मारहाण केली. तर, अजय यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अक्षय आणि दोन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. अजय हे मित्र रोहित नकवाल याच्या घरी कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे आरोपींनी अजयचा मित्र कमलेशसोबत वाद घालत मारहाण केली. आरोपी अक्षय आणि त्याच्या दोन साथीदारांनी पुन्हा मोरेवस्ती चिखली येथे येऊन अजय यांच्याशी वाद घालत मारहाण केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.