संवाद माझा

संवाद माझा

Published on

उड्डाणपुलाची अक्षरे निखळली
दिवंगत उद्योगपती भारतरत्न जेआरडी टाटा यांचे नाव कासारवाडी येथील नाशिक फाटा उड्डाणपुलाला दिलेले आहे. परंतु या नावातील अक्षरेच निखळून पडलेली आहेत. त्याने नाव अर्थहीन होत आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड हे नाव जगाच्या नकाशावर पोहोचविले. त्यांचेच नाव योग्य दिसत नाही. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाने तत्काळ दुरुस्ती करावी. अन्यथा थोर व्यक्तीचा अपमान केल्यासारखे होत आहे. हे महापालिकेला अशोभनीय आहे.
- बी. एस. पाटील, शाहूनगर
PNE25V42133

सेवा रस्त्यांची प्रचंड दुरवस्था
ताथवडे येथील पुणे - बंगलोर महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या सेवा रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या परिसरात मोठमोठी महाविद्यालये आहेत. हजारो विद्यार्थीना साधे चालणे ही अवघड झाले आहे. इथे पदपथ नाही. धोका पत्करत विद्यार्थी चालत असतात. रोज इथे अपघात होत आहेत. मोठमोठ्या खड्यांमुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. हिंजवडी आयटी पार्क आणि महाविद्यालय परिसरामुळे इथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शेकडो तक्रारी केल्या. पण प्रशासन मूग गिळून बसले आहे. हिंजवडीत झालेल्या राजकीय नेते मंडळींच्या दौऱ्यांचे काय फायदे ? हाच प्रश्न इथल्या जनतेला पडला आहे.
- योगेश अचलारे, ताथवडे
PNE25V42134

सावरकर मार्गाचा नामफलक हवा
चिंचवड - पिंपरी जोड रस्त्याचे लिंक रोड हे नाव बदलून सावरकर मार्ग नामकरण झाले. त्याला दहा वर्षांहून अधिक कालावधी झाला. तरी महापालिकेच्या लेखी त्याचा लिंक रोड म्हणूनच उल्लेख आहे. तसेच दुकानांवरील पाट्यांवर सुद्धा लिंक रोड म्हणून उल्लेख दिसतो. तरी महापालिकेने नामफलक दुरुस्त करावा. ही विनंती.
- रमेश देव, केशवनगर
PNE25V42139

गटार नियमित साफ करावे
वाकड सर्व्हे. क्र.२७२ शेंडगे वस्ती येथील गटार कधीही साफ केले जात नाही. यापूर्वी तक्रार केली होती. काही उपयोग झाला नाही. कृपया महापालिकेच्या संबंधित विभागाने तेथे लक्ष देऊन यापुढील काळात गटार नियमित साफ करण्याची व्यवस्था करावी.
- विलास वामन कलाटे, शेंडगे वस्ती, वाकड
PNE25V42137

लोखंडी खांब त्वरित हटवा
वाकड यमुनानगर येथील रस्त्यावर अनेक महिन्यांपासून लोखंडी खांब पडून आहे. या कारणास्तव तेथे घाण, कचरा झाला आहे. रस्त्यावर पाणी साचून अनारोग्यास पोषक परिस्थिती तयार झाली आहे. शिवाय रस्त्याची दुरवस्था झालेली आहेत. वाहतुकीस अडचण येत आहेत. महानगरपालिकेने त्वरित हा खांब हटवून रस्त्यावर पाणी साठणार नाही, यासाठी उपाय करावेत.
- दि.चं. बाफना, वाकड
PNE25V42136

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com