पिंपरी-चिंचवडची प्रभाग रचना २०१७ प्रमाणेच
पिंपरी, ता. २२ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना नकाशांसह शुक्रवारी (ता. २२) जाहीर झाली. त्यानुसार ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. सर्व प्रभाग चार सदस्यांचे असतील. प्रभाग रचना २०१७ प्रमाणेच असून प्रत्येक प्रभागांतील लोकसंख्या मात्र वाढलेली आहे.
महापालिकेची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. त्याची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली. कोरोना प्रतिबंधक नियम, राज्यातील बदलत्या घडामोडी आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाचे न्यायप्रविष्ट प्रकरण अशा कारणांमुळे निवडणूक होऊ शकली नाही. परिणामी, १४ मार्च २०२२ पासून महापालिकेवर प्रशासक कारभार पाहत आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचा आदेश एप्रिलमध्ये दिला होता. त्यानंतर चार सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार प्रभाग रचना तयार करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणूक विभागाला दिला होता. त्याप्रमाणे प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करून राज्य नगरविकास विभागाला सादर केला होता. नागरिकांच्या हरकती व सूचनांसाठी तो शुक्रवारी जाहीर केला आहे. त्यामुळे प्रभाग रचना नक्की कशी असेल? याची प्रतीक्षा संपली आहे. मात्र, त्यावर हरकती व सूचना चार सप्टेंबरपर्यंत मागवल्या आहेत. त्यावर सुनावणी होऊन नियोजित वेळापत्रकानुसार अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे २०२१ मध्ये अपेक्षित असलेली जनगणना झालेली नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी २०११ ची पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली आहे.
शहराची लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार)
एकूण : १७,२७,६९२
अनुसूचित जाती : २,७३,८१०
अनुसूचित जमाती : ३६,५३५
सर्वाधिक लोकसंख्येचा प्रभाग क्रमांक ९ : नेहरूनगर-मासुळकर कॉलनी : लोकसंख्या ५९,३९०
सर्वांत कमी लोकसंख्येचा प्रभाग क्रमांक ५ : भोसरी-गवळीनगर-चक्रपाणी वसाहत : लोकसंख्या ४९,०४९
सर्वाधिक अनुसूचित जाती लोकसंख्येचा प्रभाग १३ : निगडी-यमुनानगर : लोकसंख्या १५,७७०
सर्वांत कमी अनुसूचित जाती लोकसंख्येचा प्रभाग १५ : आकुर्डी प्राधिकरण : लोकसंख्या ३,३९१
सर्वाधिक अनुसूचित जमाती लोकसंख्येचा प्रभाग ४ : दिघी-बोपखेल : लोकसंख्या ४,२८६
सर्वांत कमी अनुसूचित जमाती लोकसंख्येचा प्रभाग १९ : एम्पायर इस्टेट चिंचवड स्टेशन : लोकसंख्या ३८९
---
प्रभाग क्र. - एकूण लोकसंख्या - अनुसूचित जाती - अनुसूचित जमाती
१ - चिखली गावठाण - ५७,१४९ - ७,७५९ - ७५१
२ - जाधववाडी-बोऱ्हाडेवाडी - ५७,६९४ - ७,५३४ - ८२२
३ - मोशी-डुडुळगाव-चऱ्होली - ५१,६२८ - ६,८२८ - १,०७५
४ - दिघी-बोपखेल- ५५,५३९ - ७,७९७ - ४,२८६
५ - भोसरी-गवळीनगर-चक्रपाणी वसाहत - ४९,०४९ - ५,४३७ - १,२१४
६ - धावडेवस्ती-सद्गुरूनगर- ५३,१२० - ४,७०० - १,८००
७ -भोसरी गावठाण- सॅंडविक कॉलनी - ५३,०६७ - ४,६८३ - ८२८
८ - इंद्रायणीनगर-बालाजीनगर - ५०,१६७ - ७,१९१ - १,०९०
९ - नेहरूनगर-मासुळकर कॉलनी-खराळवाडी - ५९,३९० - ११,६६३ - ६१०
१० - मोरवाडी-दत्तनगर-संभाजीनगर - ५५,६९९ - ९,२९१ - ८६०
११ - घरकुल-कृष्णानगर- ५२,८७८ - ९,९६३ - ८६५
१२ -तळवडे-त्रिवेणीनगर-रुपीनगर- ५७,३१३ - ६,८०६ - १,२६०
१३ -निगडी-यमुनानगर - ५५,०७४ - १५,७७० - ७०५
१४ -मोहननगर-काळभोरनगर- ५६,४२७ - ५,३९१ - ५९५
१५ - आकुर्डी प्राधिकरण - ५१,८५६ - ३,३९२ - ४५७
१६ - मामुर्डी-किवळे-रावेत - ५९,३३० - १०,३३७ - १,८६४
१७ - दळवीनगर-बिजलीनगर-वाल्हेकरवाडी - ५९,०८९ - ७,८८९ - ८५७
१८ - चिंचवड गावठाण - ५५,०१२ - ४,०७१ - ४४६
१९ - एम्पायर इस्टेट-चिंचवड स्टेशन- ५४,७६९ - २१,५८७ - ३८९
२० -संत तुकारामनगर-वल्लभनगर - ५३,५४९ - ११,१९८ - ९३२
२१ - पिंपरीगाव-पिंपरी कॅम्प ५६,८०० - ९,६७४ - ५२१
२२ -काळेवाडी ५८,७१० - ७,३३३ - ६३३
२३ - थेरगाव गावठाण - ४९,८४८ - ११,१३८ - ७१३
२४ - पद्मजी मिल परिसर-डांगे चौक - ५०,२४३ - ७,०४७ - ७१९
२५ - पुनावळे- वाकड-ताथवडे - ४९,९६४ - १०,७७० - १,१०५
२६ - पिंपळे निलख-विशालनगर ४९,८४७ - ७,१७२ - १,२१४
२७ - रहाटणी-काळेवाडी फाटा - ५०,३२१ - ८,१२८ - ६९८
२८ - पिंपळे सौदागर - ५१,५५० - ५,५३७ - ६६२
२९ - पिंपळे गुरव- सुदर्शननगर - ४९,१४६ - ८,०४५ - ३,३५६
३० - कासारवाडी-फुगेवाडी-दापोडी - ५७,००४ - १३,०५६- १,९१२
३१ - नवी सांगवी - ५१,८४९ - ७,५५४ - १,५५८
३२ - जुनी सांगवी - ५४,६१४ - ९,०६९ - १,७३८
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.