संवाद माझा
गतिरोधक बसवा, अतिक्रमणे हटवा
महात्मा फुलेनगर, शिवाजी पार्क, संभाजीनगरचा तुळजाभवानी मंदिर ते स्वामी विवेकानंद स्टेडियम या वर्दळीच्या रस्ता रस्त्यावर गतिरोधक बसविणे गरजेचे आहे. पादचारी मार्गावर अतिक्रमण झाले असून कचरा साचत आहे. स्थापत्य व आरोग्य विभागांकडे मागील चार वर्षांपासून पाठपुरावा करूनही अधिकारी सुस्त आहेत. प्रत्येक आठवड्यात एक दुसरा अपघात इथे पाहायला मिळत आहे. ना बेशिस्त वाहनचालक सुरक्षित आहेत; ना पादचारी. दोघेही जखमी होत आहेत. या रस्त्यावर आता तरी गतिरोधक बसवावेत, कचरा टाकणाऱ्या कारवाई करावी व पादचारी मार्ग खुला करून नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल, अशी उपाय योजना महानगरपालिकेचे अधिकारी करतील, अशी अपेक्षा आहे.
- ॲड. ज्ञानेश्वर उदागे, संभाजीनगर
PNE25V42721
सुधारण्याऐवजी एसटी बस केंद्रच बंद
हिंजवडी येथील मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बस केंद्रासमोर असा खूप चिखल पसरला आहे. यापूर्वी या केंद्राच्या दुर्दशेबद्दल तक्रार केली. मात्र, त्यात सुधारणा करण्याच्याऐवजी ती बंद करून अशा अवस्थेत ठेवली आहे.
- मोहन गर्डे, हिंजवडी
E25V42720
मुकाई मंदिर रस्ता खचला
विकासनगर येथील मुकाई मंदिर ते मुकाई चौक हा रस्ता खचला आहे. मोठा खड्डा पडला आहे. पादचारी अपघात होऊ शकतो. तरी महापालिका संबंधित अधिकारी इकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करतील का ?
- रवींद्र कदम, विकासनगर, किवळे
PNE25V42722
भुयारी मार्गात रोज स्वच्छता हवी
चिंचवड येथील डी मार्टच्या भुयारी मार्गाचे हे छायाचित्र आहे. इथे एवढी घाण असते. चालणे अवघड आहे. प्रकाश व्यवस्था नाही. एकट्या दुकट्या बायकांना तर खूपच धोकादायक आहे. इथे प्रकाश भरपूर हवा. रोजच्यारोज इथे स्वच्छता व्हायला पाहिजे.
- सुयश कुलकर्णी, एम्पायर इस्टेट, चिंचवड
PNE25V42723
पदपथाचे काम पूर्ण करा
पुनावळे कॉर्नर बीआरटी बस थांबा येथे पदपथाचे अर्धवट काम केलेले आहे. खूप मोठा खड्डा पडून त्यात पाणी साचून असते. दिवसा आणि रात्रीच्यावेळी अनेक वाहने जाताना अपघात होत असतात. कृपया महापालिकेच्या संबंधित विभागाने त्याकडे लक्ष देऊन पदपथाचे काम लवकर पूर्ण करावे.
- ऋचा वाकडे, पुनावळे
PNE25V42719
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.