मोबाइल चोरीप्रकरणी एकाला अटक

मोबाइल चोरीप्रकरणी एकाला अटक

Published on

पिंपरी : घरातून मोबाइल चोरल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना चिखलीतील जाधववाडी येथील पंतनगर येथे घडली. आरोपी नागेश देवेंद्र गलबिले (वय ४१, रा. सेक्टर क्रमांक १६, बालघरे वस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी फरीन मुस्ताक खान (रा. पंतनगर, जाधववाडी, चिंचवड) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादीच्या घरातील बेडरूममधून वीस हजार रुपये किमतीचा मोबाइल फोन चोरून नेला.

दुचाकीस्वाराला धमकावून पैसे घेतले; दोघांना अटक
पिंपरी : रस्त्यावर कुत्रा अंगावर आल्यामुळे दुचाकी रस्त्यात थांबवणाऱ्या एका दुचाकीस्वाराशी तिघांनी वाद घातला. दुचाकीस्वाराला धमकावून त्यांच्याकडील फोनमधून जबरदस्तीने पैसे ट्रान्स्फर करून घेतले. ही घटना पिंपरी येथे घडली. याप्रकरणी प्रणय कुमार स्वाईन (रा. सप्तशृंगी कॉलनी, विजयनगर, काळेवाडी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुदर्शन महादेव थोरात (वय १८) आणि यश चंदू कांबळे (वय १८, दोघेही रा. भारतनगर, पिंपरी) या दोन आरोपींना अटक केली आहे. फिर्यादी हे पिंपरी पुलाजवळील गोकूळ हॉटेलजवळून दुचाकीवरून जात असताना त्यांच्या अंगावर एक कुत्रा धावून आला. त्यामुळे त्यांनी दुचाकी थांबवली. त्यावेळी मागून येणाऱ्या रिक्षातील आरोपींनी त्यांना ‘तू ब्रेक का मारला, त्यामुळे आम्ही पडलो असतो, आमची भरपाई दे’ असे म्हणून त्यांच्याशी वाद घातला. आरोपींनी फिर्यादीला धमकावून त्याच्या हातातील १० हजार रुपये किमतीचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावून घेत त्यांच्या फोन पे खात्यातून तीन टप्प्यात एकूण ६५०० रुपये ऑनलाइन ट्रान्झेक्शन करून घेतले.

हरवलेल्या फोनमधून ऑनलाइनद्वारे पैसे लंपास
पिंपरी : एका व्यक्तीच्या हरवलेल्या मोबाइलचा गैरवापर करून त्या व्यक्तीच्या बँक खात्यातून एक लाख ५४ हजार ८१७ रुपये ऑनलाइन काढून घेतले. हा प्रकार आळंदी येथे घडला. याप्रकरणी उत्तम नामदेव अहिरे (रा. आळंदी) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांचा हरवलेला मोबाइल फोन वापरून त्यातील फोन पे ॲप्लिकेशनमध्ये प्रवेश केला. फोन पे ॲपचा पासवर्ड वापरून फिर्यादीच्या आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डमधून आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून पैसे काढून फिर्यादीची एक लाख ५४ हजार ८१७ रुपयांची फसवणूक केली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com