निगडीतील टिळक चौकामध्ये खड्ड्यांचे जाळे
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर निगडीतील टिळक चौकामध्ये खड्ड्यांचे जाळे झाले आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. पावसाचे पाणी या खड्ड्यांत साचल्यामुळे तेथील खड्डे वाहनचालकांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे गाडीला अचानक दणका बसतो आणि खड्ड्यांतील पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडते. त्यातही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हाच रस्ता पुढे आकुर्डीमधील खंडोबा चौकापर्यंत अशाच अवस्थेत आहे. महापालिकेचा कर वेळच्यावेळी निमूटपणे भरणे एवढेच नागरिकांच्या हातात आहे.
- शिवराम वैद्य, निगडी
NE२५V४४२२९
एम. एस. काटे चौकात पदपथावर कचऱ्याचे ढीग
नवी सांगवीमधील एम. एस. काटे चौकात पदपथावर कचऱ्याचे ढीग टाकले जातात. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
- मनोज पवार, पवारनगर, जुनी सांगवी
PNE२५V४४२२७
डांगे चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे सुरू करा
पिंपरी-चिंचवड महापालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरामध्ये वाहतूक नियंत्रक दिवे बसविले आहेत. परंतु, त्यापैकी काही दिवे अजूनही बंद स्थितीत आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल डांगे चौक, थेरगाव येथे वाहतूक नियंत्रक दिवे गेल्या दोन वर्षांपूर्वी बसविले आहेत. परंतु एकदाही वाहतूक नियंत्रक दिवे लागले नाहीत. महापालिकेचा खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. डांगे चौकातून हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारा नोकर वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्या ठिकाणी सकाळी व संध्याकाळी मोठी वर्दळ असते, त्यामुळे वाहतूक नियंत्रक दिवे चालू असणे महत्त्वाचे आहे. सकाळी चाकरमान्यांची तसेच स्कूलबस, कामगारांची वर्दळ असते. त्यावेळी चौकातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते. चौकात पोलिस कर्मचारी नसतात. डांगे चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे चालू केल्यास सर्व नागरिकांना शिस्त लागेल व वाहतूक सुरळीत राहील. महापालिका व वाहतूक नियंत्रक विभाग या गैरसोयीकडे लक्ष देतील का?
- ॲड. रामहरी कसबे, थेरगाव
जिजाऊ पर्यटन बागेतील वटवाघळांचा बंदोबस्त करा
चिंचवड गाव मोरया गोसावी मंदिराजवळ जिजाऊ पर्यटन बाग आहे. सुखकर्ता अपार्टमेंटसमोरील या बागेतील झाडांवरील वटवाघळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरी, त्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. याकडे महापालिका तसेच आजी-माजी नगरसेवक लक्ष देत नाही.
- सुलभा परब, चिंचवड गाव
PNE२५V४४२२६
शौचालयांची दुरवस्था
शासकीय तंत्रनिकेतन पुणे युनिव्हर्सिटी परिसरातील शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या वापरासाठी असलेल्या शौचालयांची दुरवस्था झाली आहे. स्वच्छतेचा पूर्ण अभाव असून, नियमित देखभाल होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासकीय विभागाने लक्ष देऊन आवश्यक दुरुस्ती व स्वच्छतेची व्यवस्था करावी.
- बाबुलाल वाघमारे, दापोडी
PNE२५V४४२२४
वल्लभनगर बसस्थानकातील नामदर्शक पाटी दुरुस्त करा
एस.टी. बस स्थानकांवरील नामदर्शक पाट्या त्या स्थानकाची ओळख स्पष्ट करण्यासाठी महत्त्वाच्या असतात. जसे की पिंपरी एस.टी. बस स्थानक, चिंचवड बस स्टॉप इत्यादी. या पाट्यांमुळे प्रवाशांना योग्य ठिकाणी पोहोचण्यास मदत होते. मात्र, वल्लभनगर येथील मध्यवर्ती एस.टी. बस स्थानकावर लावण्यात आलेल्या नामफलकात ‘चिंचवड’ हा शब्द गायब आहे. स्थानकाची संपूर्ण आणि अचूक ओळख पटावी, यासाठी संबंधित प्रशासनाने वल्लभनगर एस.टी. बसस्थानकातील नामदर्शक पाटी दुरुस्त करा.
- किरण पोतदार, वल्लभनगर
PNE२५V४४२२३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.