रावेतला नदी पात्रात मृतदेह आढळला

रावेतला नदी पात्रात मृतदेह आढळला

Published on

पिंपरी, ता. ३१ : रावेतमधील पवना नदीपात्रात बंधाऱ्याच्या खालील बाजूस रविवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला.
राहुल कटके (वय ४६, रा. काळेवाडी लिंक रोड, तानाजी नगर, चिंचवडगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नदी पात्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती रावेत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत मृतदेह बाहेर काढला. मृताच्या पॅन्टच्या खिशात मोबाईल व पाकिट होते. त्या पाकिटात आधार कार्ड, पॅन कार्ड व वाहन परवाना मिळाल्याने मृताची ओळख पटली. मृताच्या उत्तरीय तपासणीत संशयास्पद काही आढळले नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com