तरुणांमध्ये वाढतोय तोंडाचा 
कर्करोग ः डॉ. आजगावकर

तरुणांमध्ये वाढतोय तोंडाचा कर्करोग ः डॉ. आजगावकर

Published on

तळेगाव दाभाडे, ता. ३१ ः तोंडाचा कर्करोग हा केवळ वृद्धांचा आजार राहिला नसून ३० ते ४० वयोगटातील तरुणांमध्येही त्याचे प्रमाण वाढत आहे. धूम्रपानविरहित तंबाखू, सुपारी, चुकीची जीवनशैली आणि एचपीव्ही संसर्ग ही प्रमुख कारणे ठरत असल्याचे टीजीएच ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटरचे सर्जिकल ऑन्कोलॉजीस्ट डॉ. उत्कर्ष आजगावकर यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार तोंडाच्या कर्करोगाचे जगातील एक तृतीयांश रुग्ण भारतात आढळतात. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार सुमारे २० टक्के प्रकरणे ४५ वर्षांखालील तरुणांमध्ये दिसून येतात. डॉ. आजगावकर म्हणाले, ‘‘अल्सर, तोंडात लाल किंवा पांढरे ठिपके, रक्तस्राव ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. वेळीच निदान झाल्यास उपचारांचे सकारात्मक परिणाम मिळतात. तंबाखूजन्य पदार्थ टाळणे, निरोगी आहार, मौखिक स्वच्छता आणि सहा महिन्यांनी तपासणी आवश्यक आहे.’’
अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे डॉ. राम पाटील म्हणाले, ‘‘गेल्या दोन दशकांत तरुणांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण तिपटीने वाढले आहे. सुरवातीला लक्षणे दिसून येत नसल्याने निदानास उशीर होतो. निरोगी जीवनशैली हीच यावरची प्रभावी ढाल आहे.’’
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com