शालेय जगत
शालेय जगत
सीएमएसमध्ये ‘वसूधैव कुटुम्बकम’चे दर्शन
निगडीतील चिंचवड मल्याळी समाजम संचलित सीएमएस शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी ‘वसूधैवकुटुम्बकम’ दर्शन घडवले. यावेळी सीएमएसचे अध्यक्ष टी. पी. विजयन, सरचिटणीस सुधीर नायर, खजिनदार पी. अजयकुमार, उपाध्यक्ष पी. श्रीनिवासन, जॉय जोसेफ, कलावेधी अध्यक्ष पी. व्ही. भास्करन, सह खजिनदार राम कृष्णन, फॅन्सी विजयन, प्राचार्या बी. जी. गोपकुमार, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका चैताली लोंढे उपस्थित होते. यावेळी सोफिया मार्गारेट, सोनाली पवार, सजिता पिल्ले, आराधना जगताप, सुजाता चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. सिंधू नायर आणि नयना शेपार्ड यांनी सुत्रसंचालन केले. प्रतीक्षा दळवी यांनी आभार मानले.
---
कन्या शाळेत ‘एक पेड माँ के नाम’
पिंपरीतील कन्या शाळेत इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वड, पिंपळ, कडुलिंब, बदाम, साग, चिंच, आंबा, पेरु अशी देशी रोपे लावली. यानिमित्त पर्यावरण संरक्षणाची संकल्पनाही विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यात आली. या उपक्रमासाठी सुहास कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
---
निगडीतील शाळेत क्रीडा दीन
शिक्षण प्रसारक मंडळीची निगडीतील मराठी माध्यम शाळेत राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा झाला. शाळेचे विभागप्रमुख व सांस्कृतिक प्रमुख आणि मुख्याध्यापिका सविता बिराजदार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेच्या पूजन करण्यात आले. यानिमित्त विद्यार्थ्यांनी लाठी-काठीची प्रात्यक्षिके सादर केली. आठवीचा विद्यार्थी अथर्व गायकवाड याने भारतीय खेळ तसेच निरोगी आरोग्यासाठी मैदानी खेळांचे महत्त्व या विषयावर भाषण केले. क्रीडा शिक्षिका शितल महांकाळे व शिवाजी बांदल यांनी मेजर ध्यानचंद यांच्या योगदानाबद्दल मार्गदर्शन केले.
---
अभिषेक स्कूलमध्ये निवडणूक
अभिषेक इंटरनॅशनल स्कूलमध्ये शालेय निवडणुक झाली. यात हर्षराज सविता, तानाजी पवार, शिवानी पाटील, आर्यन माने, स्वरूप पवार, आदित्य पाटील, गर्गी पाटील, अनुष्का हरके, अर्णव पवार, स्वरा खालदकर, श्रेया मिस्त्री, अथर्व पवार या विद्यार्थ्यांची निवड झाली. या प्रतिनिधींचा शपथविधी पार पडला. मुख्याध्यापिका सुधा भट्ट यांनी स्वागत केले. गायन पथकाने सादर केलेले “एक जिंदगी” हे प्रेरक गीत विशेष आकर्षण ठरले.
---
एच् ए. स्कूल प्राथमिक, पूर्व प्राथमिक
एच. ए. (हिंदुस्थान अँटिबायोटिक्स) पूर्व प्राथमिक विभागात मादाम माँटेसरी यांचा जन्मदिन व श्रीमती ताराबाई मोडक यांचा स्मृती दिन साजरा झाला. मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे, डॉ. विठ्ठल मोरे यांच्या हस्ते मादाम माँटेसरी, श्रीमती ताराबाई मोडक व श्रीमती अनुताई वाघ यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. त्यांच्या कार्याची महती शालिनी क्षीरसागर यांनी सांगितली. धनश्री पाटील यांनी प्रार्थना म्हटली. पूर्व प्राथमिकच्या शिक्षकांनी ध्येयगीत गायले. या निमित्ताने शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी नैसर्गिक वस्तूंपासून कलाकृती बनविल्या. मनिषा भिसे यांनी सूत्रसंचालन केले. शामला दाभाडे यांनी आभार मानले.
---
कै. श्रीमती गोलांडे प्राथमिक
चिंचवडमधील कै. श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालयात गणेशोत्सव साजरा झाला. मुख्याध्यापिका उज्वला चौधरी यांनी गणेश प्रतिमेचे पूजन केले. लता डैरे यांनी सूत्रसंचालन केले. त्यांनी गणपती स्तोत्राचे महत्त्व व गणपती शब्दाचा अर्थ विशद केला. स्ट्राँग हब फाउंडेशनतर्फे गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित घेण्यात आली.
---
श्री सयाजीनाथ विद्यालय
वडमुखवाडीतील श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयात आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ उपक्रम झाला. आळंदी देवस्थान व विद्यालयातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा ज्ञानेश्वरीची प्रत व रोख रकमेचे बक्षीस देण्यात आले. आळंदी देवस्थान माऊली चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात आला. संदीप जाधव, सुभाष दाभाडे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ मोझे यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम सुरू आहे. प्राचार्य राजकुमार गायकवाड, शिक्षक रमेश कटाटे व निवृत्ती ठाणवे दर शनिवारी उपक्रमाचे नियोजन करतात. मराठीचे शिक्षक निवृत्ती ठाणवे यांनी सूत्रसंचालन केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.