पौराणिक देखावे, मंदिरांच्या प्रतिकृती पाहण्यास गर्दी
पिंपरी,ता. २ ः देशातील विविध मंदिरांच्या प्रतिकृती, पौराणिक देखावे आणि भक्तांसाठी महाप्रसाद हे पिंपरीतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे यावर्षीचे वैशिष्ट्य ठरले आहे. जगन्नाथ पुरी येथील मंदिर, रायगड येथील शिव राज्य दरबार तसेच राजस्थान येथील खाटू श्याम मंदिर यांची प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.
शिवराज्य दरबार
पॉवर हाऊस चौकातील सुवर्ण मित्र मंडळाने यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या मंडळाने रायगडावरील शिवराज्य दरबार साकारला आहे. तसेच युनेस्कोचे मानांकन मिळालेल्या किल्ल्यांची माहिती देणारे प्रदर्शन भरविले आहे. प्रा. विनायक कुलकर्णी हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
आपली संस्कृती, आपले सण
पॉवर हाऊस रस्त्यावरील स्वराज्य प्रतिष्ठानने ‘आपली संस्कृती आपले सण’ हा हालता देखावा साकारला आहे. या मंडळाचे हे १७ वे वर्ष आहे. संदीप कुदळे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
आकर्षण महाल
साई चौकातील शिवसाई मित्र मंडळाने आकर्षक महालात गणरायाची स्थापना केली आहे. मंडळाचे हे १५ वे वर्ष असून गणेशोत्सवात दररोज सायंकाळी भक्तांना अन्नदान केले जात आहे. विजय लुहाना हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती
डी वॉर्ड फ्रेडस सर्कलच्यावतीने यंदा पुरी येथील जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. मंडळाने यंदा ४१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मंडळाचे अध्यक्ष योगेश धर्मानी आहेत.
नारळात गणेशाची स्थापना
न्यू भारत मित्र मंडळाने भव्य नारळाच्या प्रतिकृतीमध्ये गणेशाची स्थापना केलेली आहे. मंडळाचे अधक्ष इंदर आर आहेत.
गोकुळधाम देखावा
गेलॉर्ड मित्र मंडळाने श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रसंगांवर गोकुळधाम देखावा सादर केला आहे. मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र गंगवानी आहेत.
१२ ज्योतिर्लिंगाची झलक
सिद्धिविनायक मित्र मंडळाने यंदा १२ ज्योतिर्लिंगाची माहिती देणारा स्थिर देखावा उभारला आहे. या मंडळाकडून भाविकांसाठी दररोज भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. मंडळाचे हे २२ वे वर्ष असून हरेश रेलवानी मंडळाचे अध्यक्ष आहेत.
टिश्यू पेपरची गणेशमूर्ती
टिश्यू पेपरपासून बनविलेली गणेशाची २६ फूट उंच पर्यावरणपूरक मूर्ती हे पिंपरीचा राजा नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्वस्तिक मित्र मंडळाचे वैशिष्ट्य आहे. घोड्यांच्या रथात विराजमान झालेल्या मूर्तीभोवती सुंदर आरास करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष नितीन नथरानी आहेत.
खाटु श्याम मंदिराची प्रतिकृती
झुलेलाल मित्र मंडळाच्यावतीने राजस्थानमधील खाटु श्याम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या मंदिराला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. मंडळाचे हे २४ वे वर्ष आहे. रोशन गुरबानी मंडळाचे अध्यक्ष आहेत.
कृष्णरुपाचा देखावा
साधू वासवानी मित्र मंडळाने कृष्णाची विविध रुपे दाखविणारा देखावा सादर केला आहे. मंडळाच्यावतीने गणेशोत्सव काळात भंडाऱ्याचे वाटप केले जाते. तसेच लहान मुलांसाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात. तसेच रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले. तुषार तेजवानी हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
कालिया मर्दन
श्रीराम मित्र मंडळाच्यावतीने कालिया मर्दन हा हालता देखावा सादर करण्यात आला आहे. या मंडळाचे हे चौथे वर्ष असून यश पोपटानी, रोशन गंगवानी हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
फुलांची आरास
महाबली मित्र मंडळाने यंदा पहिल्यांदाच गणेशाची स्थापना केली आहे. गणेश मंडपाला सुंदर फुलांची आरास करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष मावन खेमचंदानी आहेत.
जंगलातील जैवविविधता
गणराया मित्र मंडळाने यंदा जंगलातील जैवविविधता दाखविणारा देखावा साकारला असून मंडळाच्यावतीने गणेशोत्सवादरम्यान गंगा आरती देखील करण्यात आली. मंडळाचे यंदाचे ११ वे वर्ष असून गिरीश नागरानी हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
त्रिमूर्ती महाल
डायमंड मित्र मंडळाने यंदा ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे दर्शन घडविणारा त्रिमूर्ती महाल साकारला आहे. मंडळाचे अध्यक्ष दिनेश मूलचंदानी आहेत. नागरिकांसाठी लंगरचे आयोजन केले जाते.
पाऊले चालती पंढरीची वाट
जय मातादी मित्र मंडळाने आषाढी वारी सोहळ्याचा देखावा उभारला आहे. ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ या देखाव्यातून वारीतील टप्पे दाखविण्यात आले आहेत. मंडळाचे अध्यक्ष जय धनवानी आहेत.
श्रीरामाचा देखावा
विश्वराजा मित्र मंडळाने श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या भव्य मूर्ती साकारल्या आहेत. मंडळाचे अध्यक्ष प्रतीक नागदेव आहेत. मंडळाच्यावतीने लंगरद्वारे खाद्यपदार्थांचे वाटप केले जाते.
विद्युत रोषणाई
पिंपरी गावातील आझाद मित्र मंडळाने यंदा गणपतीपुढे आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. मंडळाचे हे ४० वे वर्ष आहे. विक्रम कुदळे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
विविध कार्यक्रम
सोनिगरा विहार हाउसिंग सोसायटीमध्ये गणेशोत्सवानिमित्त यावर्षी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांसाठी खास नृत्य व गायन कार्यक्रम, मुलांसाठी नाट्य व खेळ तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी भजन व गप्पा गोष्टींचे सत्र भरवले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.