‘आपली पीएमपीएमएल’ ॲपला उत्तम प्रतिसाद

‘आपली पीएमपीएमएल’ ॲपला उत्तम प्रतिसाद

Published on

अविनाश ढगे
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २ ः पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ‘आपली पीएमपीएमएल’ ॲपला ऑगस्ट महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले. आतापर्यंत १८ लाख ५० हजार ९२४ प्रवाशांनी ॲप डाऊनलोड केले, तर तिकीट आणि पास विक्रीतून ७० कोटी ७१ लाख ४६ हजार ४३६ रुपयांचे उत्पन्न मिळाले. ॲपचा प्रतिसाद वाढत असला तरी ते वापरणाऱ्यांची संख्या सरासरी ८.३३ टक्के आहे.
पीएमपी प्रशासनाने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन पेमेंट सुविधा सुरू केली आहे. प्रवाशांना घरबसल्या बसचे ‘लाइव्ह लोकेशन’ दिसावे, ऑनलाइन तिकीट व पास काढता यावा, ऑनलाइन तक्रार करता यावी, म्हणून हे ॲप विकसित करण्यात आले. १५ ऑगस्ट २०२४ पासून हे ॲप प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले. यंदा ३१ ऑगस्टपर्यंतची आकडेवारी पाहता हे चित्र दिसते.
पीएमपीची मासिक प्रवासी संख्या सरासरी साडेतीन कोटी आणि उत्पन्न सरासरी ६० कोटी रुपये आहे. या तुलनेत ॲपद्वारे तिकीट आणि पास काढणाऱ्यांची संख्या अजूनही साडेआठ टक्केही नसल्याचे दिसते.
---
दृष्टिक्षेपात
- ॲपद्वारे दरमहा सरासरी साडेपाच कोटी रुपयांची तिकीट व पास विक्री
- जुलै महिन्यातील नऊ कोटी ४० लाख ५५ हजार ६१२ ही सर्वाधिक रक्कम
-
---
अॅपचे फायदे
- प्रवाशांना तिकीट काढणे सोईस्कर
- बसचे लाइव्ह लोकेशन दिसत असल्याने पुढील प्रवासाचे नियोजन करता येते
- वाहकांवरील कामाचा ताण कमी

----------
आपली पीएमपीएमएल ॲप सुरू झाल्यापासून तिकिटासाठी सुट्टी पैसे ठेवण्याचा ताण कमी झाला आहे. ॲप चांगले आहे पण, ॲपमध्ये अजून काही सुधारणा झाल्या पाहिजे.
- विकी भंडारी, प्रवासी
----
सध्या इंटरनेटचा जमाना आहे. सर्वच सोयी-सुविधा ऑनलाइन उपलब्ध होत आहेत. प्रवाशांना तिकीटही ऑनलाइन काढता यावे म्हणून ॲप विकसित केले आहे. ॲपमधील काही त्रुटी दूर करून ते प्रवाशांना वापरण्यास अजून सोईस्कर करण्यात येणार आहे.
- पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल
----------
काय आहेत त्रुटी
ॲपचा वापर वाढविण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाला एकीकडे त्रुटी दूर कराव्या लागतील, तर दुसरीकडे जनजागृती करण्याचीही आवश्‍यकता असल्याचे दिसून येते.
- बसचे लाइव्ह ट्रॅकिंग होत नाही
- ॲप वांरवार अपडेट होत असल्याने प्रवाशांना तिकीट काढताना अडचणी
- क्लिअर कॅचे किंवा ॲप अनइन्स्टॉल करायला लागणे
- ॲपवर बसचे टाईमटेबल नाही
- बऱ्याच बस अजूनही लाइव्ह केलेल्या नाहीत
- मासिक पास काढता येत नाही
-------------
काय सुधारणा केल्या पाहिजेत
- सर्व प्रकारचे पास ॲपवर उपलब्ध करून दिले पाहिजे
- सर्व बसचे लाइव्ह ट्रॅकिंग होणे आवश्‍यक
- बस रद्द, मार्गात बदल किंवा इतर नोटिफिकेशन ॲपद्वारे प्रवाशांना कळावेत
----------
ॲप डाऊनलोड (ॲन्ड्रॉइड) - १७,३१,९२४
(आयफोन) - १,१९,०००
उत्पन्न - ७० कोटी ७१ लाख ४६ हजार ४३६ रुपये

--------
महिना - उत्पन्न
ऑगस्ट २०२४ - ६७,६२,०५५
सप्टेंबर - २,९७,६८,६३३
ऑक्टोंबर - ४,२०,३७,८३२
नोव्हेंबर - ३,६१,२६,४६७
डिसेंबर - ४,७३,८५,१३९
जानेवारी - ५,३८,८९,७४६
फेब्रुवारी - ५,१८,०६,८६९
मार्च - ५,९५,९४,४०२
एप्रिल - ६,११,८२,८५७
मे - ६,०३,२३,१८६
जून - ७,६२,६४,३७८
जुलै - ९,४०,५५,६१२
ऑगस्ट २०२५ - ८,७९,४९,२६०
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com