चिंचवड

चिंचवड

Published on

‘राजे तुम्ही असता तर’ देखाव्यातून जागृती
गांधी पेठ तालीम मित्रमंडळ दशभूजा गणपती मंडळ यावर्षी ४४ व्या वर्षात पदार्पण आहे. मंडळाने यंदा ‘राजे तुम्ही असता तर’ हा प्रबोधनात्मक जिवंत देखावा सादर केला आहे. सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती पाहून छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर मार्गदर्शन करत उपाययोजना सांगतात, असा देखावा मंडळाने साकारला आहे. कला उन्नती सामाजिक संस्था चिखली व सावितीबाई फुले पुणे विद्यापीठ ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी याचे सादरीकरण केले आहे.

‘जागर गोमातेचा’ जिवंत देखाव्यातून प्रबोधन
यंदा ६४ व्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या गांधीपेठ चिंचवडगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर मित्रमंडळ ‘चिंचवडचा राजा’ यांनी गोरक्षा संवर्धन आणि संरक्षणाचा प्रभावी संदेश देणारा ‘जागर गोमातेचा’ हा जिवंत देखावा साकारला आहे. शाहीर आसराम कसबे यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या जिवंत देखाव्यात गणेश कांबळे, शिवाजी पोळ, सार्थक कसबे, लखन जगताप, विशाल भवारी आणि स्वतः आसराम कसबे हे गाईचे महत्त्व सांगत आहेत. याबाबत मंडळाचे कार्याध्यक्ष महेश मिरजकर म्हणाले, ‘‘आपल्या संस्कृतीत गाईला आईचा दर्जा दिला आहे. देशी गायींचे संगोपन, संरक्षण आणि संवर्धन व्हावे या दृष्टीने मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या देखाव्याची संकल्पना मांडली. या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.’’

‘पुरंदरचा धुरंदर वीर मुरारबाजी’ देखावा प्रेरक
उत्कृष्ट तरुण मंडळ, भोई आळी, चिंचवडगाव यंदा आपल्या ४४ व्या वर्षात पदार्पण करत आहे. मंडळाचे अध्यक्ष नागेश आगज्ञान यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने या वर्षी ‘पुरंदरचा धुरंदर वीर मुरारबाजी’ हा ऐतिहासिक देखावा सादर करून भाविकांची मने जिंकली आहेत. स्वराज्यातील पराक्रमी सेनानी मुरारबाजींचा शौर्यगाथा प्रभावी पद्धतीने मांडण्यात आली आहे. देखाव्याला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

उत्कर्ष मित्र मंडळातर्फे स्वामींची अनुभूती
चिंचवड लिंक रोडवरील उत्कर्ष मित्र मंडळाने साकारला अक्कलकोट स्वामींचा समाधी मठ व भव्य वटवृक्ष देखाव्याला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तेथील स्वामींची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. उत्कर्ष मित्रमंडळ हे ऐतिहासिक व पौराणिक देखावे सादर करण्यात अग्रेसर अशी त्यांची ओळख आहे. मंडळाचे यंदाचे ५४ वे वर्ष असून नकुल आनंदा भोईर हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. देखाव्याची संकल्पना मंदार भोईर यांची आहे. मंडळाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम, नवरात्रोत्सव, क्रीडा स्पर्धा, आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरे, पर्यावरण जनजागृती, वृक्षरोपण, शैक्षणिक व वैद्यकीय मदत असे उपक्रम राबवले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com