‘माय फ्रेंड गणेशा’ स्पर्धेत स्वप्नील सुकक्रे प्रथम
पिंपरी, ता. ३ ः गणेशोत्सवानिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ प्रश्नमंजूषा स्पर्धेची सोडत (ड्रॉ) बुधवारी (ता. ३) काढण्यात आली. यात कासारवाडीचे स्वप्नील बबन सुकरे प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचे मानकरी ठरले. स्नेहल नितीन बाफना यांनी (भोसरी) द्वितीय, तर रूपाली संतोष बवले (तळेगाव दाभाडे) यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
उद्या (ता. ४) दुपारी पावणेतीन वाजता पारितोषिक वितरण होईल. ‘सकाळ’ने २७ ऑगस्ट रोजी ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ ही पुरवणी प्रसिद्ध केली होती. त्यातील प्रश्नावली सोडवून लगतच्या संकलन केंद्रात उत्तरपत्रिका मंगळवारपर्यंत (ता. २) जमा करायची होती. या स्पर्धेला स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. स्पर्धकांकडून प्राप्त झालेल्या उत्तरपत्रिकांमधून विजेत्यांची निवड करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, प्रसाद पवार, सचिन पवार, नीलेश वर्मा, ममता वर्मा, जगन्नाथ काटे यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली.
रमेश परदेशी प्रमुख पाहुणे
‘सकाळ’च्या ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ प्रश्नमंजूषा स्पर्धेचे पारितोषिक वितरण उद्या (ता. ४) लोकप्रिय अभिनेते रमेश परदेशी यांच्या हस्ते होणार आहे. परदेशी यांनी आतापर्यंत देऊळबंद, रेगे, फत्तेशिकस्त अशा अनेक चित्रपटांमधून काम केले आहे. मुळशी पॅटर्न या चित्रपटात त्यांनी केलेली पिट्या भाईची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. खलानायकाची भूमिका असूनही ‘पिट्या भाई’ने त्यांची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
---
काय? कुठे? केव्हा?
काय? ः माय फ्रेंड श्रीगणेशा स्पर्धेचे पारितोषिक वितरण
कधी? ः गुरुवार, ४ सप्टेंबर २०२५
केंव्हा? ः दुपारी २.३०
कुठे? ः रागा पॅलेस सभागृह, काळेवाडी फाटा - चिखली बीआरटी मार्गालगत, एम्पायर इस्टेट पुलाजवळ, काळेवाडी
---
संपर्कासाठी क्रमांक
सचिन ः ९७३०९५९६९९
---
विजेते
प्रथम ः स्वप्नील बबन सुकरे (कासारवाडी).
द्वितीय ः स्नेहल नितीन बाफना (भोसरी).
तृतीय ः रूपाली संतोष बवले (तळेगाव दाभाडे).
चौथे ःआयुष हेगडे (पिंपळे सौदागर), आराध्या खंडू भोसले (चिंचवड), गणेश प्रेम शेट्टी (चिंचवड), चाँदबी सय्यद (प्राधिकरण), आराध्या निशांत शिंदे (चिंचवड), पुष्पा महादू वाघेरे (पिंपरी), समर्थ वैभव जाधव (शाहुनगर).
पाचवे ः शशिकला म. बिहानी (चिंचवड), वेदिका संतोष गायकवाड (चिंचवड), सानिका बुटाला (मोहननगर), आराध्या नागनाथ नडमने (पिंपळे गुरव), श्रुती सतीश गोठणकर (थेरगाव), आरोही अजय सांगळे (भोसरी), आशा विजय पाटील (पिंपळे निलख), माया लक्ष्मण जाधव (पिंपरी), शशिकला मिलिंद पोतदार (मोशी), श्रेयस दत्तात्रय लंके (वडगाव मावळ), यशश्री धिरज लांडगे (भोसरी).
सहावे ः रिद्धी बजरंग जाधव (थेरगाव), रेश्मा अमित शिंदे (पिंपळे सौदागर), राधिका रोहित गराडे (सोमाटणे फाटा), हेमलता सुनील क्षीरसागर (पिंपळे गुरव), मृदुल जिग्नेश भोसले (आळंदी), धनश्री अभिजित भुजबळ (वाकड), सान्वी विशाल सूर्यवंशी (चिंचवड), संगीता विशाल दाभोले (पिंपरी), आरोही अजय मुळे (मोशी), शिवराम निवृत्तीराव हाके (चिंचवड), अस्मिता अमित दुसाने (रावेत), साधना गोविंद गुप्ता (चिंचवड), मीना अनिल अगरवाल (प्राधिकरण), नंदा दिलीप डांगे (चिंचवड), श्रेया कुदळे (पिंपरीगाव).
सातवे ः अनिष योगेश येवला (मोशी), पृथ्वीराज पाटील (चऱ्होली), कावेरी रवींद्र गायकवाड (चिंचवड), कावेरी प्रशांत पाटील (थेरगाव), अक्षरा अतुल भोईर (चिंचवड), साजिरी चेतन कारळे (थेरगाव), जुई मिलिंद कारळे (थेरगाव), वसंतराव बाबूराव फुले (थेरगाव), राम विशाल खुडे (वाकड), ममता भावसार (तापकीरनगर), कावेरी दामू राणे (पिंपळे गुरव).
आठवे ः धनश्री मंदार देशपांडे (तळेगाव दाभाडे), अजिंक्य
देशपांडे (रावेत), आकांक्षा विजय भामरे (ताथवडे), सविता कृष्णा भालेकर (तळवडे), लेशा उमेश चौधरी (रावेत), राजश्री चिंचकर (पिंपळे गुरव), राणी नितीन राऊत (नवी सांगवी), रणवीर सुदाम वाळुंज (नवी सांगवी), निमिष राजेश जाधव (पिंपळे गुरव), मीनल य. पवार (आकुर्डी), सुनंदा प्रमोद टेकवडे (तळेगाव दाभाडे).
नववे ः ईशा मारवाडी (आकुर्डी), तेजस्विनी किशोर फुंदे (देहूरोड), अज्वित अजिंक्य मोहिते (नवी सांगवी), सुदाम एकनाथ हिरवे (पिंपळे गुरव), विजय एन. येवले (पिंपळे निलख), मधुरा मुकुंद बावकर (चिंचवडगाव), निशीधा प्रवीण ढगे (पिंपळे गुरव), कलावती चव्हाण (नवी सांगवी), रजनी हंसराज भुरुक (पिंपळे गुरव), निर्मला तानवडे (चिंचवड), अभिजित चिंतामणी देशपांडे (देहूरोड), रोहित अजय पाटुकले (जगताप डेअरी), महावीर प्रभाकर आहेरकर (तळेगाव दाभाडे), राजेश्र्वरी बनकर (सांगवी), श्रीपाद रघुनाथ बुरसे (तळेगाव दाभाडे), रमेश ओंकार पिंजरकर (थेरगाव), स्वराज विजय बुरटे (निगडी), हर्षिका स्वप्नील सावंत (चिंचवड), किरण दत्तात्रय इंगळे (काळेवाडी), राजवीर संतोष गरड (चिंचवड), ज्ञानेश दीपक कुदळे (पिंपरीगाव).
दहावे ः अबीर प्रीती बेत (वाकड), स्पृहा कौस्तुभ पंची (थेरगाव), अमेय सारंग कुलकर्णी, निगडी, आर्वी मयूर भोंगळे (बालेवाडी), वंदना अविनाश सावंत (प्राधिकरण), युवराज हर्षल लाटे (पिंपरी), मनोहर दत्तोपंत जोशी (हिंजवडी), सुचिता योगेश शेटे (दिघी), ज्योती प. ठाकूर (रावेत), रूपाली किशोर तिखे (नवी सांगवी), निर्मला चंद्रकांत पिंगळे (तळेगाव दाभाडे), आर्यन शंकर फेंचनळ (चिंचवड), लीना अमित जगताप (मावळ), सुमन शामराव काळे (पिंपरी), निकिता प्रफुल्ल अजरदे (किवळे), संगीता प्रवीण येवले (निगडी), मंगल नवनाथ खिलारी (तळेगाव दाभाडे), इशिता राजाराम शेळकंदे (रावेत), सुमेध सुनील गायकवाड (कासारवाडी), संगीता बसुराज जाधव (नवी सांगवी), निधी मंदार देशमुख (चिंचवड).
---
वाचकांमधील कलात्मकता
‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी झालेल्या वाचकांची कलात्मकताही या निमित्ताने दिसून आली. उत्तरपत्रिकेमध्ये उत्तरे भरून पाठविताना ‘सकाळ’च्या बाल वाचकांनीही आपली कलाकुसरही दाखविली. अनंता बाबूराव लंके, देवांश तेजस साळकर, समर्थ वैभव जाधव, सिया संदीप एडगावकर , आशा विजय पाटील, श्रेयस दत्तात्रय लंके, दीपमाला देवेंद्र जहागीरदार यांनी उत्तरपत्रिकेसोबतच गणेशाची रेखाटलेली विविध रूपे लक्षवेधी ठरली. विनायक सावंत या वाचकाने पत्राद्वारे ‘सकाळ’बाबत कृतज्ञता व्यक्त केली.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.