पिंपरी-चिंचवड
रोटरी क्लबच्या वतीने विसर्जन मिरवणूकीत पोलिसांना मदत
सोमाटणे, ता. ३ ः रोटरी क्लबच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीत सोमाटणे आणि तळेगावात कार्यरत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली होती.
सात दिवसाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीची सुरवात मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाली. परंतु, पोलिस कर्मचाऱ्यांचा
बंदोबस्त मंगळवारी सकाळपासूनच सुरु करण्यात आला होता आणि रात्री उशिरापर्यंत चालू होता. बंदोबस्तासाठी कार्यरत असणाऱ्या एकूण २२५ पोलिस कर्मचाऱ्यांच्या रात्रीच्या जेवणाची सोय क्लबच्या वतीने संस्थापक मनोज ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी पोलिस उपआयुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कोपनर यांनी रोटरी पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.