चार टोळ्यांवर मकोका, ७१ तडीपार, तीन गुन्हेगार स्थानबद्ध

चार टोळ्यांवर मकोका, ७१ तडीपार, तीन गुन्हेगार स्थानबद्ध

Published on

चार टोळ्यांवर मकोका, ४१ तडीपार, तीन गुन्हेगार स्थानबद्ध

पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई ः सण-उत्सव, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णय

पिंपरी, ता. ४ : गेल्या महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चार टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. तीन सराईत गुन्हेगारांना नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले असून ४१ गुन्हेगारांना तडीपार केले आहे. आगामी सण, उत्सव आणि निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
काळेवाडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात अभिषेक निंबाळकर, त्याचे साथीदार अनुज गोळे, हर्ष महाडिक, सुजल कोरे, आयुष खैरे, सागर शिंदे, आकाश उर्फ गोट्या पवार, शेखर उर्फ बाब्या जांभोरे या टोळीवर सात गंभीर गुन्ह्यांची नोंद आढळली. तसेच निगडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात सुरेश ढाका आणि त्याचे साथीदार महिपाल बिष्णोई, सुभाष बिष्णोई या टोळीवर नऊ गंभीर गुन्हे आढळले. तर अविनाश आवाड, त्याचे साथीदार शंतनू म्हसुडगे, साहील शेख, युवराज उर्फ बिच्या अडागळे, सोमनाथ तुपे, निखिल उर्फ मॅड्या चव्हाण, चिराग चंडालिया, शाहनवाज उर्फ शान्या शेख, आदित्य चव्हाण, सौरभ अरगडे, प्रतीक रसाळ आणि एका अल्पवयीन मुलावर ११ गंभीर गुन्हे आढळले. त्याचप्रमाणे चिखली पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्याच्या तपासात अरमान नानावत त्याचा साथीदार सोनू गुडदावत यांच्यावर १३ गंभीर गुन्हे आढळले. या टोळ्या स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होत्या. या गुन्हेगारांवर खून, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा, गंभीर दुखापत, जबरी चोरी, खंडणी मागणे, दुखापत, अमली पदार्थाची साठवणूक, विक्री करणे, मृत्यू घडवून आणण्याची पूर्वतयारी करुन चोरी करणे, अमली पदार्थाची तस्करी करणे, बेकायदेशीर अग्निशस्त्रे व हत्यार जवळ बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मागील आठ महिन्यांत शहरातील २८ गुन्हेगारी टोळ्यांमधील १३९ आरोपींना मकोका लावण्यात आला आहे.


तिघे जण नागपूरमध्ये स्थानबद्ध
रावेत आणि देहूरोड परिसरातील अट्टल गुन्हेगार मोनेश उर्फ मोहनीश देवेंद्र नाटेकर (वय २६, रा. रावेत) याच्यावर ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. दिघी, आळंदी परिसरातील अट्टल गुन्हेगार संतोष उर्फ पिंट्या लहू काळे (वय २८, रा. कोयाळी, खेड) याच्यावर १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. तळेगाव दाभाडे, चाकण परिसरातील अट्टल गुन्हेगार संकेत ऊर्फ माँटी जगदीश नाणेकर (वय २७, रा. नाणेकरवाडी, खेड) याच्यावर चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. या तीनही गुन्हेगारांना एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे. मागील आठ महिन्यांत अशा १८ कारवाई केल्या आहेत.


४१ गुन्हेगार तडीपार
पिंपरी चिंचवड पोलिसांनी मागील ऑगस्ट महिन्यात ४१ गुन्हेगारांना तडीपार केले आहे. त्यामध्ये परिमंडळ एक मधून १० गुन्हेगारांना तडीपार केले. परिमंडळ दोनमधून १० गुन्हेगारांना तर परिमंडळ तीन मधून २१ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com