पिंपरीत प्रारुप प्रभाग रचनेवर ३१८ हरकती

पिंपरीत प्रारुप प्रभाग रचनेवर ३१८ हरकती
Published on

पिंपरी, ता. ४ : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. त्यावर हरकती नोंदविण्याचा गुरुवार (ता.४) अखेरचा दिवस होता. या दिवशी २७६ हरकती नोंदविण्यात आल्या. तर, शहरातून आतापर्यंत ३१८ हरकती दाखल झाल्या आहेत.

महापालिका निवडणुकीसाठीचा प्रारूप प्रभाग रचना नकाशा www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर २२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आला. तसेच नागरिकांच्या पाहणीसाठी महापालिका भवनात आणि सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या आवारात नकाशे व माहिती उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, ही रचना फेब्रुवारी २०१७ प्रमाणेच असल्याने सुरुवातीला हरकतींचे प्रमाण अत्यल्प होते. पहिल्या पाच दिवसांत केवळ तीन तक्रारी आल्या. तीन सप्टेंबरपर्यंत सर्व प्रभागांतून मिळून अवघ्या ३२ हरकती दाखल झाल्या. पण, अखेरच्या दिवशी हे प्रमाण अचानक वाढले. यामध्ये सर्वाधिक ११५ हरकती प्रभाग क्रमांक दहा (मोरवाडी, लालटोपीनगर, इंदिरानगर, दत्तनगर, शाहूनगर, संभाजीनगर आदी) आणि त्यापाठोपाठ ९८ हरकती प्रभाग क्रमांक एकमधून (चिखली गावठाण भाग, पाटीलनगर, गणेशनगर, मोरेवस्ती भाग, सोनवणे वस्ती परिसर) आल्या आहेत.

दाखल झालेल्या हरकतींवर नऊ ते १२ सप्टेंबरदरम्यान सुनावणी होणार आहे. सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया होणार आहे.
- अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, निवडणूक विभाग

मनपा मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालयाकडे दाखल हरकती
मुख्य कार्यालय - ३००
अ - ०
ब - ०
क - ०
ड - ०
इ - १
फ - १३
ग - १
ह - २
ई-मेल - १
एकूण - ३१८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com