शहरात ''शिक्षक दीन'' उत्साहात साजरा
पिंपरी, ता. ५ ः शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांत राष्ट्रीय शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी वर्गात जाऊन शिकविले. अध्यापकांचा सत्कार करण्यात आला.
एच. ए. प्राथमिक
एच. ए. (हिंदुस्थान अँटिबायोटिक्स) प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेतून चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळा चालविली. विद्यार्थ्यांनी सुंदर भेटकार्ड बनविली. ती शिक्षकांना देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या सुरेखा भामरे यांनी शिक्षक दिनाची माहिती सांगितली. शुभांगी गवारी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पालक शिक्षक संघातर्फे गेली ३५ वर्षे ज्ञानदानाचे करणाऱ्या सुरेखा जाधव, तीस वर्षे सेवा झालेल्या अर्चना गोरे, डॉ. विठ्ठल मोरे, अनिता येनगुल, समीक्षा इसवे, ज्योती भोसले, शहनाझ हेब्बाळकर आणि सीमा हांगे या शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
---
जयवंत प्राथमिक
जयवंत प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका वंदना सावंत, अगस्त्य फाउंडेशनच्या रोहिणी खैरे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. सातवीतील विद्यार्थ्यांनी पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. सातवीतील विद्यार्थिनी दिक्षा यादव मुख्याध्यापिका बनली होती. विद्यार्थी प्रतीक साळवेने सूत्रसंचालन केले. संयोजन वंदना कोरपे यांनी केले.
---
सयाजीनाथ विद्यालय
वडमुखवाडीतील श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयात दहावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अध्यापन केले. प्राचार्य राजकुमार गायकवाड, विद्यार्थी मुख्याध्यापक रामानंद घुले यांच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. विभाग प्रमुख नितीन वारखडे, नीलम नाईक, ज्येष्ठ शिक्षक प्रवीण सोनवणे, संजय जैनक, डॉ. कल्याण वाघ आदी यावेळी उपस्थित होते. संचालिका प्रा. अलका पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, प्राचार्य राजकुमार गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सोमेश्वर ढाकरगे, निरंजन रोकडे, अनुष्का शिंदे, स्नेहल भोसले यांनी विभागप्रमुखाची भूमिका बजावली. नीतेश लोहकरे, प्रशांत लामदाडे, नागेश दुधाटे, कृष्णा कान्होले यांनी सहाय्यकाची जबाबदारी पार पाडली. महेश शिंदे क्रीडा शिक्षक बनला. प्रगती इंगळे व श्रावणी जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
---
कै. कोंडाबाई गोलांडे प्राथमिक
चिंचवडमधील कै. श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापिका उज्वला चौधरी, संस्थेचे सचिव चंद्रशेखर पाटील, आयआयबी करिअर इन्स्टिट्यूटचे (पुणे) व्यवस्थापकीय संचालक महेश लोहारे, असोसिएट संचालक सुनील शेवाळे, अकाउंट प्रमुख दौलत कांबळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. मनीषा डोंगरदिवे यांनी सूत्रसंचालन केले. विद्या सोनवणे यांना संस्थेतर्फे पुरस्कार देण्यात आला.
---
श्री गुरू गणेश माध्यमिक
श्री गुरु गणेश विद्यामंदिर माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळा चालविली. विद्यार्थी प्राचार्य म्हणून आतिश कुसळे, पर्यवेक्षक म्हणून विनय लोखंडे यांनी कामकाज पाहिले. प्राचार्य हनुमंत मारकड यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती सांगितली. पाचवीतील विद्यार्थी वेदांत सातपुते, ईश्वरी आगवाने, प्रथमेश कांबळे, दिक्षिता गावित, अथर्व काळे यांनी मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षक हितेंद्र लोखंडे, शिक्षिका धनश्री कांबळे, पल्लवी बापुले यांनी संयोजन केले. दहावीतील विद्यार्थिनी अक्षदा फपाळ व ईश्वरी फपाळ यांनी सूत्रसंचालन केले. संतोष सुरवसे यांनी आभार मानले.
-
कन्या विद्यालय
पिंपरी वाघेरे येथील कन्या विद्यालयात दहावीच्या विद्यार्थिनी शाळा चालविली. प्राची खेडेकर व शिवानी बोरुडे यांनी सूत्रसंचालन केले. मुस्कान शेख, आदिती तांबे, अस्मिता काटे, पल्लवी मुंडे, कृपा परदेशी, कावेरी कोळी, रजपूत साक्षी यांनी मनोगत व्यक्त केले. ''हर घर झंडा’ या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा झाल्या. विजेत्यांना मुख्याध्यापिका सुवर्णा परदेशी यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.
राजाराम राऊत व रोहिणी काकडे यांनी आयोजन केले. पर्यवेक्षिका वैशाली मेमाणे यांनी मार्गदर्शन केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.