आदिवासी वस्तीगृहाबाबत
‘अभाविप’चे आंदोलन

आदिवासी वस्तीगृहाबाबत ‘अभाविप’चे आंदोलन

Published on

पिंपरी, ता. ८ ः वाकड येथील आदिवासी शासकीय वसतिगृहातील दैनंदिन अडचणी, सुरक्षिततेचा अभाव तसेच इमारतीच्या जीर्ण अवस्थेविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) पिंपरी चिंचवड महानगरतर्फे आंदोलन करण्यात आले. यात अभाविपचे कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, वाकड येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीमध्ये काही स्लॅब प्लॅस्टर कोसळल्याची घटना गुरुवारी (ता. ४) रात्री अकरा वाजता घडली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण झालेले आहे. ऑक्टोंबर २०२३ मध्ये देखील अशी घटना घडली होती. त्यावेळी अनिता पथवे विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली होती. प्रशासनाने घटनेच्या गांभीर्य समजून न घेता दुर्लक्षित केल्याने आज पुन्हा अशी घटना घडलेली आहे. गृहपाल व प्रकल्प कार्यालयाकडून वसतिगृहातील समस्यांना दुर्लक्षित करून आदिवासी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ केला जात आहे.
या सर्व बाबींवर वेळोवेळी पाठपुरावा करून आश्वासनांची तत्काळ अंमलबजावणी झालीच पाहिजे, असे स्पष्ट मत अभाविप पिंपरी चिंचवड महानगर मंत्री हिमांशू नागरे, महानगर सहमंत्री कार्तिक पवार, सोहेल शेख, विद्यार्थी प्रतिनिधी प्रशांत गावंडे व महेंद्र भोये यांनी व्यक्त केले.

चर्चेनंतर दिलेली आश्वासने
- वसतिगृहाची इमारत सुरक्षित आहे का याची खातरजमा करण्यासाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा तृतीय पक्षामार्फत एका महिन्याच्या आत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल. तसेच पुणे शहरातील इतर आदिवासी वसतिगृहांचीही तपासणी होणार आहे.
- ऑक्टोबर २०२३ मधील घटनेबाबत संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची शिफारस सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) विभाग, ठाणे यांच्यामार्फत करण्यात येईल.
३) वसतिगृहातील स्लॅबचे प्लास्टर दुरुस्तीचे काम दोन दिवसांच्या आत सुरू करण्यात येईल
४) मुलींच्या वसतिगृहाच्या गृहपाल मंजूषा वायसे यांच्यावरील तक्रारींची चौकशी करून आवश्यक कार्यवाहीसाठी आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्तांकडे शिफारस केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com