संवाद माझा
मोरवाडी ग्रेट सेपरेटर पुलाखाली खड्डा
महापालिका भवनासमोर मोरवाडी ग्रेट सेपरेटर पुलाखाली येथे मोठा चौकोनी खड्डा पडला आहे. पुलाखाली अंधार असल्यामुळे खड्डा सहज दिसत नाही. यात सर्वांधिक त्रास दुचाकी चालकांना होतो. पर्यायाने सर्व वाहनांचा वेग मंदावतो. त्यामुळे लवकरात लवकर हा खड्डा बुजवावा.
- रुपेश धनवे, दळवीनगर, चिंचवड
PNE25V47428
बेवारस दुचाकी वाहने तातडीने हटवा
नवी सांगवी येथील एम. एस. काटे चौक वळणावर अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याकडील दुचाकी वाहने बेवारस स्थितीत सोडून दिली. या वाहनांची मोडतोड झाली असून, त्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे दुर्गंध येत आहे. ही वाहने तातडीने हटवावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. परंतु महानगरपालिका आणि वाहतूक विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दाद नक्की मागायची कोठे?
-प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
PNE25V47426
सिमेंट ब्लॉकचा अडथळा
गंगानगर प्राधिकरण सेक्टर नंबर २८ निगडी येथे बऱ्याच दिवसापासून सिमेंटचे मोठे ब्लॉक रस्त्यावर पडले आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी आणि पादचाऱ्यांना अडथळे सहन करावे लागत आहेत. तसेच रहदारीलाही निर्माण होत आहे. हे ब्लॉक हटवून रस्ता मोकळा करण्याची आवश्यकता आहे.
- सिराज बशीर शेख, प्राधिकरण
PNE25V47429
मोठी सांडपाणी वाहिनी आवश्यक
दापोडी येथील एसएमएस कॉलनी गल्ली क्रमांक ३ नवीन करार चर्चजवळ दापोडी या भागात सांडपाण्याची नवीन वाहिनी टाकणे आवश्यक आहे. येथे १५ वर्षांपूर्वीची जुनी सांडपाणी वाहिनी आहे. तेथे नवीन आणि मोठी सांडपाणी वाहिनी टाकली, तर कायमचा प्रश्न मिटेल. येथील नागरिकांना सांडपाण्याचा त्रास होत असून, तो सोडविणे आवश्यक आहे.
- अकिल अ. शेख, दापोडी
PNE25V47424
वीज खांबांवर अनधिकृत जाहिरातबाजी
चिंचवड-पिंपरी लिंक रोडवर महानगरपालिकेने लावलेल्या नक्षीदार वीज खांबांवर काही संस्थांनी त्यांचे जाहिरातीचे फलक लावले आहेत. त्यामुळे हे खांब विद्रूप झाले आहेत. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ते हटवावेत. तसेच असे फलक लावणाऱ्यांकडून दंड वसुली करावी.
- सतीश मोघे, प्रेमसागर, चिंचवड.
PNE25V47427
रावेतमध्ये पादचारी मार्गावर अतिक्रमणे
फुलजाई चौकात रस्ता व पदपथावर वाहने उभी केली जात आहेत. तसेच भाजीपाला विक्रेत्यांमुळे पादचारी मार्गावर चालणेदेखील कठीण जाते. तेथून वाहने नेण्यासही अडचणी येत आहेत. वारंवार तक्रारी करून परिस्थीती जैसे थे आहे. या पदपथाला गणपती मंदिरासमोरील रस्त्याला कोणीच वाली नाही का? संबंधितांनी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
-श्रीनिवास धोंगडे, शिंदेवस्ती, रावेत.
PNE25V47425
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.