बहुतांश शाळांचा परिसर अपघात प्रवण
पिंपरी, ता. ८ : पिंपरी चिंचवड शहरातील खासगी आणि महापालिका शाळांसमोर गतिरोधक नाहीत. शहरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मुख्य रस्ता ओलांडून जावे लागते. या शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीमुळे धोक्यात आली आहे. परिणामी, विद्यार्थ्यांसह पालकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे, अशा शाळा अपघात प्रवण स्थळ बनल्या असल्याचे चित्र शहरात पाहण्यास मिळत आहे.
शहरात सहाशेपेक्षा अधिक खासगी शाळा आहेत. त्यात लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बहुतांश शाळांमध्ये सकाळी शाळेत जाताना आणि शाळा सुटल्यावर वाहनांची गर्दी होते. बहुतांश विद्यार्थी चालत येतात; तर काही सायकलवर येतात. या शाळांत जाणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना शहरातील मुख्य रस्ता ओलांडून जावे लागते. अशावेळी बऱ्याचदा शाळा परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असते. पालक आणि विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडावा लागतो. परंतु; रस्त्यावर गतिरोधक नसल्याने भरधाव वेगातील वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. यापूर्वी अनेकवेळा रस्ता ओलांडताना छोटे अपघात होऊन अनेक विद्यार्थ्यांना दुखापत झाली आहे.
अविचारी चालकांचाही धोका
विद्यार्थी सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून निघतात. काही पालकांचा अपवाद सोडला; तर इतर सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गातील, घराजवळील विद्यार्थ्यांसोबत शाळेत येतात. त्यामुळे त्यांना रस्त्यावरील या वाहनांच्या गर्दीचा सामना करावा लागतो. एक नाही; तर शाळेत जाईपर्यंत काही विद्यार्थ्यांनी तीन वेळा मुख्य रस्ता ओलांडावा लागतो. तसेच शहरातील शाळांजवळ चौकात गर्दी असते. वाहनांच्या गर्दीतून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागते. काही वेळा तर काही अविचारी प्रवृत्तीचे लोक रस्त्यावरील नागरिक, इतर वाहनांचा काहीही विचार न करता स्वतःचे दुचाकी, चारचाकी वाहन वेगाने चालवतात. त्यामुळे शाळा सुटल्यावर चार वाजता याच पद्धतीने विद्यार्थ्यांना या अडचणींचा सामना करावा लागतो.
फलकही नाहीत
शाळेसमोर किमान दोन ते तीन फुटांचा उतार गतिरोधकाला असावा. शाळा, महाविद्यालये, गर्दीची ठिकाणे अशा ठिकाणी गतिरोधक केला जातो. महामार्ग राज्य मार्गावर पांढरे पट्टे असलेले दिशादर्शक गतिरोधक असावेत. काही भागांत गतिरोधक आहेत. पण त्यावर पांढरे पट्टे नाहीत, असे गतिरोधक कळून येत नाहीत. ‘पुढे शाळा आहे, वाहने सावकाश चालवा ’, असे फलकही अनेक शाळांसमोर आढळून आले नाहीत.
कुठे गतिरोधक नाहीत ?
आकुर्डीतील सेंट उर्सुला, मॉडर्न शैक्षणिक संकुल यमुनानगर, निगडीतील अमृता विद्यालय, भगवती इंग्लिश मीडियम, मोरवाडीतील सी. टी. इंटरनॅशनल स्कूल, महापालिका शाळा अजंठानगर, मनपा चिखली जाधववाडी शाळा, मोशी बोऱ्हाडेवाडीतील एस. एस. इंटरनॅशनल स्कूल, आकुर्डीतील म्हाळसाकांत शाळा, काळेवाडीतील बी.टी.इंटरनॅशनल स्कूल, निगडीतील पीसीएमसी स्कूल सेक्टर २२, भोसरीतील इंटिलिजेंट कॅटेड आदी.
माझा मुलगा निगडीतील शाळेत इयत्ता आठवीला आहे. सकाळी शाळेत जातेवेळी व परत जेणेकरून त्याला वाहनांचा अंदाज घेत यावे लागते. याठिकाणी गतिरोधक नसल्याने वाहनांची गती कमी होत नाही. त्यामुळे शहरातील प्रमुख ठिकाणी गतिरोधक करावेत. शाळेत जाताना शहरातील मुख्य रस्ता ओलांडावा लागतो. परंतु; रस्त्यावरील वाहनांची गर्दी पाहून भीती वाटते.
- बी. एस. पाटील, पालक
‘पुढे शाळा आहे’ असा फलक शाळेसमोरील रस्त्यावर असायलाच पाहिजे. जेणेकरुन वाहन चालक सतर्क होतात. ज्या शाळांसमोर गतिरोधक नाहीत. त्याबाबत महापालिका गतिरोधक, स्पीड टेबल
धोरण ठरवणार आहे. परिपत्रक काढून संबंधित शाळा, रुग्णालय यांच्यासमोर गतिरोधक असल्याचे फलक लावण्यात येतील.
- बापूसाहेब गायकवाड, सह शहर अभियंता, दळणवळण विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका
PNE25V47852
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.