पिंपरी-चिंचवड
मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून एकूण ४० मंडळांवर कारवाइ
उत्सव काळात ४० मंडळांवर कारवाई
नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात, लेझर लाइटचा वापर करून पोलिसांनी काढलेल्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून एकूण ४० मंडळांवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. त्यात वाकड १७, पिंपरी ०८, निगडी ०५, सांगवी ०५, दापोडी ०३, तळेगाव दाभाडे ०२ या पोलीस ठाणे अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.