वाचक लिहीतात
रावेत परिसरात उद्यान हवे
रावेत येथील एस. बी. पाटील रस्ता परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढलेली आहे. त्या अनुषंगाने येथे एकही उद्यान नाही. जवळपास उद्यान झाले; तर आबालवृद्धांसाठी ते सोयीस्कर व विरंगुळ्यासाठी महत्वाचे ठरेल. त्यादृष्टीने लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत.
- धीरज पाटील, रावेत
डांगे चौकातील सिग्नल चालू करा
साधारण दोन वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने थेरगावच्या डांगे चौक येथे वाहतूक नियंत्रक दिवे बसविले. परंतु एकदाही वाहतूक नियंत्रक दिवे लागले नाहीत. महानगरपालिकेचा खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. डांगे चौकातून हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारा नोकर वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्या ठिकाणी सकाळ व संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतु, तेव्हा वाहतूक नियंत्रक दिवे चालू नसतात. त्यावेळी चौकातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते. महानगरपालिका व वाहतूक नियंत्रक विभाग या गैरसोयीकडे लक्ष देईल का ?
- ॲड. रामहरी कसबे, थेरगाव