
‘सकाळ’ला सर्वाधिक पसंती
देशात ‘टॉप टेन’मध्ये स्थान; ‘एबीसी’चे शिक्कामोर्तब, ‘सकाळ’ महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे दैनिक. ही बातमी वाचून आनंद झाला. माझ्या परिवाराचे सर्वाधिक पसंतीचे दैनिक म्हणजे ‘सकाळ’. ‘सकाळ टुडे’ मधील शहराच्या सखोल बातम्या, ‘भटकंतीतील गंमती’, राधिका देशपांडे यांचे ‘ते सफर...’, ‘कानमंत्र’, सतत नवनवीन स्पर्धा, सप्तरंग पुरवणीमधील गिरिजा दुधाट यांचे शस्त्रवेध : शस्त्र ते शास्त्र हा लेख तर अभ्यासपूर्ण, पुस्तक परिचय, गौरी देशपांडे यांचे मायबोली पलीकडची अक्षरे, बाबा भांड यांचे उत्तमोत्तम लेख, केदार फाळके यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन संघर्षावर आधारित ‘श्री छत्रपती भारत भाग्यविधाता’ लेख, डॉ. कांचन गंगा व अशोककुमार सिंग यांचे पुष्पांजली राजश्री मराठे यांचा ‘संताचा श्री गणेश’, अशा विविध लेखमालिकांमधून ‘सकाळ’ आमच्या भेटीला येत असतो. ‘सकाळ’ला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून शुभेच्छा !
- प्रदीप गायकवाड