

पिंपरी, ता. २६ : दिव्यांग मुलांना बसमध्ये घेण्यासाठी रस्त्याच्या बाजूला बस थांबवली असता, दोघांनी पीएमपी बसचालकाला बेदम मारहाण केली. तसेच पीएमपीचे महिला कर्मचारी व निगडी प्राधिकरणातील दिव्यांग मुलांसाठीच्या कामायनी विद्यामंदिर शाळेतील कर्मचारी यांनाही शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. हा प्रकार निगडी प्राधिकरणातील कामायनी विद्यामंदिर शाळेसमोर घडला.
याप्रकरणी सतीश दत्तू राठोड (वय ३६, रा. त्रिवेणीनगर, चिखली) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विनायक पाटील व स्वराज विनायक पाटील (दोघेही रा. सेक्टर क्रमांक २४, टेल्को हौसिंग सोसायटी, प्राधिकरण, निगडी ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी राठोड हे पीएमपीएल बसचालक असून, राठोड आणि महिला कर्मचारी हे निगडी प्राधिकरण येथील कामायनी विद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यांना घेण्यासाठी गेले होते. त्यांना घेण्यासाठी बस रस्त्याच्या बाजूला थांबवली होती.
दरम्यान, तेथे बाजूला राहणारे आरोपी तेथे आले. ‘तुम्ही आमच्या गाडीला खेटून बस उभी करता’ असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ करून, त्यांना बसच्या केबिनमधून खाली ओढून हाता बुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, त्यांना सोडविण्यासाठी पीएमपीची महिला कर्मचारी व शाळेचे कर्मचारी आले असता, त्यांनाही आरोपींनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.