

पिंपरी, ता. २६ ः ‘वाहतूक कोंडीमुक्त पिंपरी-चिंचवड’ हा संकल्प हाती घेतला आहे. महापालिका, वाहतूक पोलिस, एमआयडीसी, पीएमआरडीए यांच्या समन्वयाने शहरातील प्रमुख ‘रेड स्पॉट’ निश्चित करून, वाहतूक सुलभीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
महापालिकेमार्फत काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्यावरील ऑटो क्लस्टर ते आयुक्त निवासस्थान दरम्यान इंडोलिंक युरोसिटी परिसरात ‘मिसिंग लिंक’ रस्ता विकसित केला जात आहे. यामुळे काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्यावरील वाहने थेट मार्गाने जाऊ शकणार आहेत. ‘पीएमपीएमएल’च्या बसगाड्यांसाठीदेखील मार्ग सुसंगत होणार आहे.
दरम्यान, निगडीतील त्रिवेणीनगरमार्गे नाशिक महामार्ग व जुन्या पुणे-मुंबई महामार्गाशी जोडणाऱ्या ७५ मीटर रुंद मिसिंग लिंकचे काम पूर्ण झाले आहे. हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत झाल्यामुळे अवजड वाहनांची वर्दळ मुख्य रस्त्यांवरून कमी होऊन पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास आमदार लांडगे यांनी व्यक्त केला.
‘‘निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक बीआरटीएस रस्ता, बोपखेल, पिंपरी डेअरी फार्म येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि सुकर वाहतूक सुविधा देण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत.
- महेश लांडगे, आमदार.
फोटोः 09733
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.