संवाद नागरीकांचा

संवाद नागरीकांचा

Published on

पदपथावरील वाहने धोकादायक
पिंपळे निलख येथील विशालनगर डिपी रोड समोरील पदपथावर अशा मोठ्या मोटारी उभ्या केल्या जातात. परिणामी, पादचाऱ्याला मुख्य रस्त्यावर यावे लागते. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी स्वतः हॉटेल व्यवस्थापक यांना भेटून ही अडचण सांगितले असता त्यांनी सुरक्षा रक्षक नेमून अशी चारचाकी वाहने लावण्यास मज्जाव केला होता. गेल्या आठवडाभरापासून तेथे सुरक्षा रक्षक त्यांनी काढल्यामुळे अशी चारचाकी वाहने पुन्हा सर्रास लावली जात आहेत. संबंधित विभागाने कारवाई करणे गरजचे आहे.
- गोविंद गायकवाड, पिंपळे निलख
NE25V25702

कचऱ्याची सफाई करावी
मोशीच्या आदर्शनगर, तापकीरनगर येथील ९० मीटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येत आहे. सर्वत्र घाण पसरली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित परिसराची साफसफाई करून घ्यावी. तेथे कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी. ‘माझे शहर स्वच्छ शहर, सुंदर शहर’ हे ब्रीद वाक्य फक्त कागदोपत्री न वापरता प्रत्यक्षात अमलात आणावे.
- निर्गुण थोरे, चऱ्होली
PNE25V25705

रस्त्यांची तातडीने दुरुस्त करा
काळेवाडी येथील तापकीरनगर, साई मल्हार कॉलनी परिसरातील रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. मुख्य रस्त्यावर आणि चेंबरजवळ एक मोठा खड्डा पडलेला आहे. त्याने वाहतुकीस अडथळा होत असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. अपघात होईपर्यंतच प्रशासन झोपलेले राहणार का? की सामान्य नागरिकाच्या जिवाला किंमतच उरलेली नाही ? महापालिकेकडे प्रचंड निधी, मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान असूनही रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्याचे साधे काम वेळेत होत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. साई मल्हार कॉलनी, तापकीरनगर येथील या धोकादायक खड्ड्यांची तातडीने डागडुजी करण्यात यावी.
- विवेक तापकीर, तापकीरनगर, काळेवाडी
NE25V25704

पाण्याचा निचरा करावा
किवळे येथील आदर्शनगरमधील अमूल शॉप समोर, के विल्ला सोसायटी (सर्वे नंबर ६७/१) येथे गेल्या १५ दिवसांपासून पावसाचे पाणी साचले आहे. त्याने डेंगीचे प्रमाण वाढू शकते. प्रशासनाने लवकर योग्य ती कार्यवाही करावी.
- समाधान गायकवाड, रावेत
PNE25V25703

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com