सकाळ संवाद
प्राधिकरण परिसरात रस्ते अरुंद
निगडी प्राधिकरण सेक्टर २४, २७ आणि २८ मध्ये हरित सेतू प्रकल्प योजने अंतर्गत मुख्य रस्ते आणि अंतर्गत सेवा रस्त्यावरील पदपथ सुशोभीकरण केले आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या पदपथाची रुंदी जास्त झाली आहे. मुख्य वाहतुकीचा रस्ता फारच अरुंद झाला आहे. सायकल मार्गिका नावाला उरली आहे. रस्त्यावरच पार्किंग केले जात असल्याने वाहने समोर आली, तर एका वाहनाला रस्त्याकडेला थांबूनच पुढे जावे लागते. या प्रकल्पामुळे प्राधिकरणमध्ये नागरिकांना वाहतुकीचा प्रश्न भेडसावत आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता हरित सेतू प्रकल्प लादलेला आहे.
- प्रणय सावंत, प्राधिकरण
८०४५३
चेंबरशेजारील खड्डा दुरुस्त करावा
चिंचवड बिजलीनगर परिसरात विश्वेश्वर मंदिर, आर्विकर निवासासमोर असलेले चेंबरशेजारी खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. येथे सायकल व दुचाकीस्वार पडत आहे. दुरुस्त न केल्यास चेंबरला मोठे भगदाड पडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी. या भागात जागोजागी खड्डे पडलेले आहे. या रस्त्यांचीही दुरुस्ती केली जावी.
- राजाभाऊ आर्विकर, बिजलीनगर
८०४५२
कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
या वर्षी धरणे शंभर टक्के भरली असली, तरी पण पिंपळे निलखमध्ये कायमच पाण्याची टंचाई असते. एकतर दिवसआड पाणी येते. ते देखील कमी दाबाने असते. कित्येक महिन्यांपासून हेच सुरू आहे. कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाने संबंधित तक्रारीची दखल घेत पाणीपुरवठा सुरळीत करावा.
- सनी शिंदे, पिंपळे निलख.

